Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > राजन यांच्या भूमिकेला आयएमएफचे आव्हान

राजन यांच्या भूमिकेला आयएमएफचे आव्हान

जगाला महामंदीचा धोका असल्याचा इशारा देणारे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या दाव्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आव्हान दिले आहे.

By admin | Updated: June 28, 2015 22:20 IST2015-06-28T22:20:53+5:302015-06-28T22:20:53+5:30

जगाला महामंदीचा धोका असल्याचा इशारा देणारे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या दाव्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आव्हान दिले आहे.

IMF's challenge to Rajan's role | राजन यांच्या भूमिकेला आयएमएफचे आव्हान

राजन यांच्या भूमिकेला आयएमएफचे आव्हान

वॉशिंग्टन : जगाला महामंदीचा धोका असल्याचा इशारा देणारे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या दाव्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आव्हान दिले आहे. स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देणारे पतधोरण जागतिक आर्थिक संकटाला कारणीभूत ठरू शकते, या राजन यांच्या भूमिकेला नाणेनिधीच्या शोधपत्रात आव्हान देण्यात आले आहे.
राजन हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ होते. तसेच २००७ मध्ये अमेरिकेत उद्भवलेल्या आर्थिक संकटाचे भाकीत वर्तविणाऱ्या तज्ज्ञांपैकी ते एक होते. जगभरातील केंद्रीय बँकांतील नरम पतधोरणाच्या चढाओढीमुळे होणाऱ्या परिणामांबाबत इशारा देत राजन यांनी यावर तोडगा काढण्यासाठी नियमात फेरबदल करण्याचे आवाहन केले आहे. यावरून जगभरात चर्चेला तोंड फुटले आहे. यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. औद्योगिकदृष्ट्या प्रगत आणि उदयोन्मुख बाजारपेठांपुरतीची ही समस्या मर्यादित नाही, तर ही जागतिक समस्या आहे, असेही त्यांनी लंडन बिझनेस स्कूल येथे आयोजित परिषदेत केले होते.

> जग महामंदीच्या उंबरठ्यावर आहे, असे राजन यांच्या म्हणण्याचा अर्थ होत नाही. राजन यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, असा खुलासा रिझर्व्ह बँकेने केला आहे. १९३० मध्ये जग महामंदीच्या विळख्यात सापडले होते. त्यावेळी तशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामागची कारणेही अनेक होती.

Web Title: IMF's challenge to Rajan's role