मनोज गडनीस, मुंबई
फेसबुक, टिष्ट्वटर, लिंक्डइनवर तुमच्या पोस्टला कितपत लाइक्स मिळतात, तुमच्या मताला तिथे किती किंमत आहे किंवा डिजिटल माध्यमात तुमची ‘इमेज’ कशी आहे, यावर लवकरच कर्जाची पत ठरणार आहे! सोशल मीडियावरील इमेजच्या आधारे पत मानांकन निश्चित करण्याची पद्धती अमेरिकेत रुजल्यानंतर आता भारतीयांच्या आर्थिक सवयींचा मागोवा घेऊन पत ठरविणाऱ्या ‘सिबिल’मध्येही याच्यावर गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. सध्याच्या वित्तीय मापन पद्धतीस पूरक ठरेल अशी ही नवी व्यवस्था असून, त्याच्या मांडणीवर सध्या काम सुरू झाल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेतील ‘द फेअर आयसॅक कॉर्पोरेशन’ (फिको) या संस्थेने सोशल मीडियावरील इमेज आणि त्या व्यक्तीची पत याचा संबंध विशद करणारे मॉडेल विकसित केल्यानंतर त्याला अमेरिकेच्या शिखर बँकेने मान्यता देत कर्ज वितरण प्रणालीत अतिरिक्त तपासणी बाब म्हणून समाविष्ट करण्यास अनुमती दिली. याच मॉडेलचा भारतात कर्जाची पत ठरविणाऱ्या सिबिलनेही अभ्यास सुरू केल्याची माहिती आहे. तसेच लवकरच याच्या अंमलबजावणीचे संकेतही मिळत आहेत. सोशल मीडियावरील इमेज मोजणी जरी भविष्यात गृहीत धरली जाणार असली तरी यावरच सर्वस्वी कर्जाची पत अवलंबून नसेल. पारंपरिक पद्धतीला पूरक अशी ही नवी पद्धती असेल. तसेच, एखाद्या व्यक्तीचे डिजिटल मीडियावर अस्तित्वच नसेल तरी त्याचा यामुळे कोणताही तोटा होणार नाही, अशी माहिती या घडामोडींशी संबंधित सूत्राने दिली. सोशल मीडियावर तुम्ही केलेली पोस्ट, मिळणाऱ्या लाइक्स, तुमच्या खात्यातील प्रभावी लोक, तुमच्या मताची किंमत हे घटक प्रामुख्याने विचारात घेत तुमच्या ‘डिजिटल व्यक्तिमत्त्वा’चे पैलू जोखण्यात येतील व त्याद्वारे तुमचे मूल्यमापन होईल. प्राप्तिकर विभागानेही गेल्या दोन वर्षांपासून लिंक्डइनवर खाते असल्यास त्याचा तपशील देण्याचे आवाहन करदात्याला केले आहे.
अशा गोष्टींमुळे सोशल मीडियाकडे बघण्याचा दृष्टिकोन गंभीर होत असतानाच आता कर्जाची पत ठरविण्यासाठी सोशल मीडियावरील ‘वर्तन’ तपासले जाणार असल्याने डिजिटल मीडियाचे महत्त्व अधोरेखित होताना दिसत आहे.
सोशल मीडियावरील ‘इमेज’ ठरवेल आता कर्जाची पत!
फेसबुक, टिष्ट्वटर, लिंक्डइनवर तुमच्या पोस्टला कितपत लाइक्स मिळतात, तुमच्या मताला तिथे किती किंमत आहे किंवा डिजिटल माध्यमात तुमची ‘इमेज’ कशी
By admin | Updated: August 3, 2015 08:58 IST2015-08-03T02:30:53+5:302015-08-03T08:58:38+5:30
फेसबुक, टिष्ट्वटर, लिंक्डइनवर तुमच्या पोस्टला कितपत लाइक्स मिळतात, तुमच्या मताला तिथे किती किंमत आहे किंवा डिजिटल माध्यमात तुमची ‘इमेज’ कशी
