Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > I'm Loving it... मॅक्‍डीमध्ये मिळणार अंडा बुर्जी , मसाला डोसा बर्गर

I'm Loving it... मॅक्‍डीमध्ये मिळणार अंडा बुर्जी , मसाला डोसा बर्गर

मॅकडॉनॉल्डने ग्राहकांसाठी खास मसाल डोसा व अंडा बुर्जी फ्लेवरचे बर्गर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

By admin | Updated: January 11, 2017 12:29 IST2017-01-11T12:24:28+5:302017-01-11T12:29:45+5:30

मॅकडॉनॉल्डने ग्राहकांसाठी खास मसाल डोसा व अंडा बुर्जी फ्लेवरचे बर्गर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

I'm loving it ... McDaddy will get egg burgery, Masala dosa burger | I'm Loving it... मॅक्‍डीमध्ये मिळणार अंडा बुर्जी , मसाला डोसा बर्गर

I'm Loving it... मॅक्‍डीमध्ये मिळणार अंडा बुर्जी , मसाला डोसा बर्गर

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११- ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेते काय नवनवीन क्लुप्त्या लढवतील ते सांगता येत नाही. मध्यंतरी नवरात्रीच्या काळात डॉमिनोजने  उपासाचा पिझ्झा आणला होता. चटकमटक पण तितकचं मसालेदार खाण्याची सवय असणा-या भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मूळच्या पाश्चात्य असणा-या मॅकडोन्लाडनेही भारतीय चव सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच मॅकडीमध्ये साला डोसा, अंडा बुर्जी अशा विविध चवींचे बर्गर आणण्याच्या तयारीत आहे. 
(नवरात्री स्पेशल,'डॉमिनोज'मध्ये आता फक्त व्हेज पिझ्झा)
  •  
 
' आय अॅम लव्हिंग इट' अशी टॅगलाईन मिरवणारे मॅकडोनाल्ड लहानांपासून मोठ्या-वृद्धापंर्यत, सर्वांमध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॅकडीतर्फे नव्या चवीचे बर्गर पेश करणार आहे. सकाळी नाश्त्याच्या वेळेत अनेक नागरिक डोसा किंवा भुर्जी या स्वस्त पण पोटभरीच्या खाण्याला पसंती देतात, हेच ध्यानात ठेऊन मॅकडी अशा वेगवेगळ्या चवीचे बर्गर आणणार आहे. मोलगा पोडी सॉस असलेले मसाला डोसा बर्गर, अंडा बुर्जी हे पदार्थ मॅकडोनल्ड्सच्या मेन्यूकार्डमध्ये पाहायला मिळणार असून नवीन चवीचे हे बर्गर सुरूवातील मुंबईतील काही आऊटलेट्समध्ये उपलब्ध असतील.  येत्या वीकेंडपासूनच हे नवीन पदार्थ ग्राहकांना चाखता येतील. यापूर्वीही मॅकडीने आलू टिक्की आणि चिकन टिक्की चवीचे बर्गर आपल्या मेन्यूमध्ये आणले होते, जे ग्राहकांत्या पसंतीस उतरले होते. यापूर्वीही केएफसी, डॉमिनोजने असे प्रयोग राबवत अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता.

Web Title: I'm loving it ... McDaddy will get egg burgery, Masala dosa burger