Lokmat Money > बिझनेस न्यूज > इफ्फी, सेंट झेवियर पवित्र शवप्रदर्शन वाहतूक व्यवस्था, सुरक्षेसाठी आव्हान

इफ्फी, सेंट झेवियर पवित्र शवप्रदर्शन वाहतूक व्यवस्था, सुरक्षेसाठी आव्हान

पणजी : विकएंडला येणार्‍या पर्यटकांच्या टोळधाडीचा फटका गोव्यातील खास करून किनारी भागातील लोकांना सतत बसत असतानाच आगामी इफ्फी तसेच सेंट झेवियर पवित्र शवप्रदर्शनासाठी लाखोंच्या संख्येने येणारे पर्यटक तसेच भाविकांना हाताळण्यासाठी पोलीस यंत्रणा किती सक्षम आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

By admin | Updated: October 25, 2014 22:42 IST2014-10-25T22:42:52+5:302014-10-25T22:42:52+5:30

पणजी : विकएंडला येणार्‍या पर्यटकांच्या टोळधाडीचा फटका गोव्यातील खास करून किनारी भागातील लोकांना सतत बसत असतानाच आगामी इफ्फी तसेच सेंट झेवियर पवित्र शवप्रदर्शनासाठी लाखोंच्या संख्येने येणारे पर्यटक तसेच भाविकांना हाताळण्यासाठी पोलीस यंत्रणा किती सक्षम आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Iffi, St. Xavier's Holy Show Transport System, Challenge for Security | इफ्फी, सेंट झेवियर पवित्र शवप्रदर्शन वाहतूक व्यवस्था, सुरक्षेसाठी आव्हान

इफ्फी, सेंट झेवियर पवित्र शवप्रदर्शन वाहतूक व्यवस्था, सुरक्षेसाठी आव्हान

जी : विकएंडला येणार्‍या पर्यटकांच्या टोळधाडीचा फटका गोव्यातील खास करून किनारी भागातील लोकांना सतत बसत असतानाच आगामी इफ्फी तसेच सेंट झेवियर पवित्र शवप्रदर्शनासाठी लाखोंच्या संख्येने येणारे पर्यटक तसेच भाविकांना हाताळण्यासाठी पोलीस यंत्रणा किती सक्षम आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२२ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेले सेंट झेवियर पवित्र शवप्रदर्शन, तसेच याच काळात होणार्‍या इफ्फीमुळे राज्यात भाविक तसेच पर्यटकांची गर्दी प्रचंड वाढणार असून सरकारी यंत्रणेला हात टेकण्याची पाळी येऊ शकते. सरकारतर्फे मात्र ही स्थिती हाताळण्यासाठी पुरेशी व्यवस्था असेल, असा दावा केला जात आहे.
........................
जुने गोवेत दिवशी ९00 पोलीस सांभाळणार वाहतूक व्यवस्था
वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस म्हणाले की, वाहतूक व्यवस्थेविषयी योजना तयार करण्याचे काम चालू आहे. पवित्र शवप्रदर्शन काळात जुने गोवेतच पोलिसांच्या तीन पाळ्या लावल्या जाणार असून प्रत्येक पाळीत किमान ३00 वाहतूक पोलीस असतील. तेथे दिवशी ९00, तर पणजीत इफ्फीच्या ठिकाणी दिवशी ३00 मिळून रोज १२00 पोलीस लागणार आहेत. आम्ही या कामासाठी अतिरिक्त पोलीस बळ मागणार आहोत.
..................................
पर्यटकांना हाताळण्यासाठी पुरेशा सुविधा नाहीत, हे स्पष्ट दिसून येत आहेत. सेंट फ्रान्सिस झेवियर पवित्र शवप्रदर्शनासाठी ४४ दिवसांच्या काळात ५0 लाख भाविक भेट देतील, अशी अपेक्षा आहे. त्यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा देण्याची सरकारची जबाबदारी आहे. शवप्रदर्शन काळात जुने गोवेत कमीत कमी खासगी वाहने जातील, अशी खबरदारी घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Iffi, St. Xavier's Holy Show Transport System, Challenge for Security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.