शर्डी : साईंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पारंपरिक भिक्षा झोळीच्या निमित्ताने शुक्रवारी साईच आपल्या दारी भिक्षेसाठी अवतरले या श्रद्धेतून शहरातील ग्रामस्थ व भाविकांनी पाऊणशे पोती धान्य व एकोणसाठ हजाराच्या रकमेचे दान भिक्षा झोळीत टाकले़ शुक्रवारी लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला़त्रिसदस्यीय समितीचे सदस्य जिल्हाधिकारी अनिल कवडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी आपले पद, प्रतिष्ठा विसरुन आत्मिक आनंद मिळवून देणार्या व अहंकार गळून पाडणार्या या कार्यक्रमात भिक्षा झोळी घेवून सहभागी झाले होते़ पहाटे साईप्रतिमेच्या व साईसच्चरित्र ग्रंथाच्या मिरवणुकीने उत्सवाच्या मुख्य दिवसाचा श्रीगणेशा झाला़ द्वारकामाईत सुरू झालेल्या अखंड पारायण सोहळ्याची सांगता झाली़ यानंतर भिक्षा झोळीचा तर माध्यान्हीला जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते आराधना विधीचा कार्यक्रम झाला़ साईबाबांच्या पुण्यतिथी निमित्त साईनगरी नटली आहे़विविधरंगी फुलांनी सजवलेली,सुवर्णालंकाराने नटलेली,चित्ताकर्षक वस्त्रांनी लपेटलेली साईंची समाधीवरील मनमोहक मूर्ती भाविकांचे भान हरपवणारी आहे. रात्री नऊ वाजता शहरातून साईंची सुवर्ण रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़ (प्रतिनिधी)--------------------------------------------------------------------------------------------------
साई पुण्यतिथीला लाखोंची हजेरी
शिर्डी : साईंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पारंपरिक भिक्षा झोळीच्या निमित्ताने शुक्रवारी साईच आपल्या दारी भिक्षेसाठी अवतरले या श्रद्धेतून शहरातील ग्रामस्थ व भाविकांनी पाऊणशे पोती धान्य व एकोणसाठ हजाराच्या रकमेचे दान भिक्षा झोळीत टाकले़ शुक्रवारी लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला़
By admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:24+5:302014-10-03T22:56:24+5:30