Lokmat Money > बिझनेस न्यूज > गोव्यातील प्राप्तिकरात प्रचंड घसरण

गोव्यातील प्राप्तिकरात प्रचंड घसरण

गोव्यातून जमा होणाऱ्या प्राप्तिकरात तीन वर्षांत प्रचंड घसरण झाली आहे. २०१३-१४च्या अखेरीस एकूण रक्कम २० टक्क्यांवर आली आहे.

By admin | Updated: July 15, 2014 02:19 IST2014-07-15T02:19:25+5:302014-07-15T02:19:25+5:30

गोव्यातून जमा होणाऱ्या प्राप्तिकरात तीन वर्षांत प्रचंड घसरण झाली आहे. २०१३-१४च्या अखेरीस एकूण रक्कम २० टक्क्यांवर आली आहे.

The huge decline in earnings in Goa | गोव्यातील प्राप्तिकरात प्रचंड घसरण

गोव्यातील प्राप्तिकरात प्रचंड घसरण

पणजी : गोव्यातून जमा होणाऱ्या प्राप्तिकरात तीन वर्षांत प्रचंड घसरण झाली आहे. २०१३-१४च्या अखेरीस एकूण रक्कम २० टक्क्यांवर आली आहे. २०११-१२ या आर्थिक वर्षात ३ हजार ४४१.३० कोटी रुपये प्राप्तिकर जमा झाला होता. मात्र, २०१३-१४ मध्ये ही रक्कम फक्त ९१८ कोटी रुपये आहे. खाणमालकांतर्फे भरल्या जाणाऱ्या प्राप्तिकरात खाणबंदीनंतर मोठा फरक झाला आहे. खाणबंदीपूर्वी पाच खाणमालकांकडून १ हजार ७४२ कोटी रुपये प्राप्तिकराच्या रूपात भरले जायचे. आता, म्हणजे २०१३-१४ मध्ये हा आकडा फक्त ४९.०१ कोटी रुपयांवर आला आहे. खनिज उलाढालीतून मिळणाऱ्या सुमारे १ हजार ७०० कोटी रुपयांवर प्राप्तिकर खात्याला पाणी सोडावे लागले. ही माहिती, माहिती हक्क कायद्याखाली प्राप्त झाली.
२०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी आगाऊरक्कम भरणाऱ्या पहिल्या पाच उद्योजकांमध्ये कॉलोरकॉन एशिया कंपनी ४६ कोटी, तुमकूर मिनरल्स कंपनी २९.६८ कोटी, ग्वाला कोझर इंडिया कंपनी २९.४१ कोटी, नानू इस्टेट कंपनी ९.२५ कोटी व साउथ वेस्ट पोर्ट कंपनीने ८.५५ कोटी रुपये भरले आहेत. सर्वाधिक कर भरणाऱ्यांची जागा आता अन्य व्यावसायिकांनी घेतली आहे.
२०१०-११ आणि २०११-१२ या दोन आर्थिक वर्षांत प्राप्तिकर भरणाऱ्या पहिल्या पाच कंपन्यांमध्ये सेसा गोवा व सेसा रिसोर्सिस या कंपन्यांनी सतत पहिला क्रमांक पटकावला होता. या कंपन्यांनी दोन्ही वर्षी प्रत्येकी ८०० कोटींच्या वर कर भरला आहे. २०१०-११ मध्ये सेसा कंपनीने ८८५ कोटी रुपये तर २०११-१२ या आर्थिक वर्षात ६४० कोटी (सेसा) आणि सेसा रिसोर्सिसतर्फे २३४ कोटी रुपये भरल्याची माहिती प्राप्तिकर खात्याने दिली आहे. मात्र, त्यानंतरच्या काळात पहिल्या पाचमध्येही या कंपनीचा समावेश नाही.
व्ही. एस. धेंपो कंपनीने २०१०-११ मध्ये ३३५ कोटी रुपये प्राप्तिकराच्या स्वरूपात भरले. मात्र, २०१२-१३ या वर्षी सर्वाधिक कर भरणाऱ्या पहिल्या पाच खाणमालकांच्या यादीत धेंपो कंपनीचे नाव नाही. २०१३-१४ मध्ये या कंपनीने ३.४० कोटी रुपये कर भरला आहे.
मे. व्ही. एम. साळगावकर कंपनीने आतापर्यंत प्रत्येक वर्षी प्राप्तिकर भरल्याची नोंद आहे. मात्र, खाणबंदीमुळे ही रक्कम प्रत्येक वर्षी कमी होत गेली. २०१०-११ मध्ये ३३५ कोटी रुपये प्राप्तिकर भरणारी ही कंपनी २०१३-१४ मध्ये चक्क ९.८३ कोटींवर आली. त्यापूर्वीच्या वर्षी ही रक्कम व्ही. एम. साळगावकर व बंधू ३२.३० कोटी व साळगावकर सेल्स इंटरनॅशनलतर्फे २५.९६ कोटी रुपये प्राप्तिकर भरला होता.
सोसिएदाद द फोमेंतो या कंपनीने २०१२-१३ पर्यंत प्राप्तिकर भरल्याची नोंद आहे. पहिल्या पाच खाण कंपन्यांमध्ये ‘फोमेंतो’चे नाव आहे. ही रक्कम १७५ कोटी (२०१०-११)पासून दोन वर्षांत फक्त ६५ कोटी (२०१२-१३)वर आल्याचे दिसते.
(प्रतिनिधी)
आदल्याच वर्षी कंपनीने १९५ कोटी रुपये प्राप्तिकर भरला होता. २०११-१२ या आर्थिक वर्षात चौगुले कंपनीने १९५ कोटी रुपये प्राप्तिकर भरला. मात्र, त्यापूर्वीच्या वर्षी अथवा नंतरच्या काळात या कंपनीने पहिल्या पाचांतील स्थान गमावले. बांदेकर कंपनीने १५.७५ कोटी रुपये प्राप्तिकर भरून २०१२-१३ या वर्षी पहिल्या पाच प्राप्तिकर भरणाऱ्या खाणमालकांमध्ये स्थान प्राप्त केले होते.

Web Title: The huge decline in earnings in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.