Lokmat Money > बिझनेस न्यूज > एचएसबीसी ५0 हजार कर्मचा-यांना काढणार

एचएसबीसी ५0 हजार कर्मचा-यांना काढणार

जगातील मोठ्या बँकात गणना असणाऱ्या एचएसबीसी बँकेने कर्मचारी कपातीची योजना जाहीर केली असून, पहिल्या फटक्यात ५० हजार लोकांना नारळ देण्यात येणार आहेत.

By admin | Updated: June 10, 2015 00:20 IST2015-06-09T23:42:13+5:302015-06-10T00:20:19+5:30

जगातील मोठ्या बँकात गणना असणाऱ्या एचएसबीसी बँकेने कर्मचारी कपातीची योजना जाहीर केली असून, पहिल्या फटक्यात ५० हजार लोकांना नारळ देण्यात येणार आहेत.

HSBC to remove 50,000 employees | एचएसबीसी ५0 हजार कर्मचा-यांना काढणार

एचएसबीसी ५0 हजार कर्मचा-यांना काढणार

हाँगकाँग : जगातील मोठ्या बँकात गणना असणाऱ्या एचएसबीसी बँकेने कर्मचारी कपातीची योजना जाहीर केली असून, पहिल्या फटक्यात ५० हजार लोकांना नारळ देण्यात येणार आहेत. कामात सुधारणा करण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होईल असे बँकेतर्फे मंगळवारी जाहीर करण्यात आले. बँकेच्या जवळपास २० टक्के नागरिकांना घरी पाठविण्यात येणार आहे.
ब्राझील आणि तुर्कस्तान येथील शाखेतून २० ते २५ हजार व राहिलेले २५ हजार कर्मचारी बँकेच्या मूळ शाखेतून कमी केले जातील. एचएसबीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट गलिव्हर यांनी ही माहिती हाँगकाँग स्टॉक एक्स्चेंजला दिली.
फक्त २.०८ लाख कायम कर्मचारी या कपातीनंतर बँकेत २ लाख ८ हजार कायम कर्मचारी राहतील. २०१० मध्ये बँकेत २ लाख ९५ हजार कर्मचारी होते. २०१४ मध्ये ही संख्या २ लाख ५८ हजारावर आणण्यात आली. आता बँकेने ५० हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही कर्मचारी कपात केल्यानंतर एचएसबीसी बँकेकडे शिल्लक राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ०८ हजार असेल. बँकेच्या कर्मचारी कपात प्रस्तावामुळे जगभरातील
बँकिंग व्यवसायात खळबळ उडाली आहे. (वृत्तसंस्था)

कपातीने प्रश्न सुटणार नाही!
कर्मचारी कपातीची ही प्रक्रिया २०१७ पर्यंत चालणार आहे. या कपातीनंतर बँकेच्या कम्प्लायन्स डिव्हिजनमध्ये तसेच ग्रोथ डिव्हिजनमध्ये नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता आहे, पण त्याची घोषणा आता करण्यात आलेली नाही.

दरम्यान, केवळ कर्मचारी कपात करुन एचएसबीसी बँकेसमोरील प्रश्न सुटण्यासारखे नाहीत,त्यासाठी बँकेच्या व्यवस्थापनेने आपल्या कार्यपद्धतीतील गुंतागुंत कमी करणे गरजेचे आहे असे मिझो सिक्युरीटी अशियाचे विशेषज्ञ जेम्स अ‍ॅटॉस यांनी म्हटले आहे.

Web Title: HSBC to remove 50,000 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.