ब्रसेल्स : युरोझोन नेत्यांनी नव्या ग्रीस सुधारणा प्रस्तावांचे स्वागत केल्याच्या पार्श्वभूमीवर या देशाला दिवाळखोरीपासून वाचविण्यासाठी येत्या काही दिवसांत करार घडून येईल, अशी आशा निर्माण झाली आहे. ग्रीसच्या ताज्या प्रस्तावांमुळे काही प्रगती झाली असली तरी आणखी खूप काही करणे आवश्यक असल्याचे जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी नमूद केले. ग्रीसने महिनाअखेरीस १.५ अब्ज युरोचे कर्ज न फेडल्यास युरो आणि युरोपियन युनियन संकटात येईल, असा इशाराही मर्केल यांनी दिला आहे.
तत्पूर्वी ग्रीसचे पंतप्रधान अॅलेक्सिस सिप्रास यांनी नवा प्रस्ताव दिला होता. कर्जदात्यांनी ग्रीसचा प्रस्ताव स्वीकारल्यास त्याला ७.२ अब्ज युरोचे आर्थिक पॅकेज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार
आहे.
ग्रीस संकटातून बाहेर पडण्याची आशा
युरोझोन नेत्यांनी नव्या ग्रीस सुधारणा प्रस्तावांचे स्वागत केल्याच्या पार्श्वभूमीवर या देशाला दिवाळखोरीपासून वाचविण्यासाठी येत्या काही दिवसांत
By admin | Updated: June 24, 2015 00:27 IST2015-06-24T00:27:59+5:302015-06-24T00:27:59+5:30
युरोझोन नेत्यांनी नव्या ग्रीस सुधारणा प्रस्तावांचे स्वागत केल्याच्या पार्श्वभूमीवर या देशाला दिवाळखोरीपासून वाचविण्यासाठी येत्या काही दिवसांत
