Lokmat Money > बिझनेस न्यूज > होंडा कारच्या किमती वाढणार

होंडा कारच्या किमती वाढणार

जानेवारी २०१६ पासून आपल्या कारच्या सर्व मॉडेल्सच्या किमती १६,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे होंडा कार्सने स्पष्ट केले आहे.

By admin | Updated: December 24, 2015 00:16 IST2015-12-24T00:16:48+5:302015-12-24T00:16:48+5:30

जानेवारी २०१६ पासून आपल्या कारच्या सर्व मॉडेल्सच्या किमती १६,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे होंडा कार्सने स्पष्ट केले आहे.

Honda car prices to go up | होंडा कारच्या किमती वाढणार

होंडा कारच्या किमती वाढणार

नवी दिल्ली : जानेवारी २०१६ पासून आपल्या कारच्या सर्व मॉडेल्सच्या किमती १६,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे होंडा कार्सने स्पष्ट केले आहे.
होंडा कार्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सेन यांनी सांगितले की, जानेवारीपासून कंपनी कारच्या किमतीत १०,००० ते १६,००० रुपयांपर्यंत वाढ करणार आहे. उत्पादनासाठीचा खर्च वाढत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनी सध्या छोटी कार ब्रायो ते सीआर-व्ही मॉडेलपर्यंतच्या कारची विक्री करते. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, जनरल मोटर्स, ह्युंदाई, टोयोटा आणि जर्मनीची मर्सिडीज बेंज आदी कंपन्यांनी जानेवारीपासून कारच्या किमती वाढविण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

Web Title: Honda car prices to go up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.