मुंबई : व्यावसायिक बँकांचे व्याजदर ठरविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शुक्रवारी १ एप्रिलपासून गृहकर्जाचे हप्ते कमी होण्यास सुरुवात झाली. स्टेट बँक आॅफ इंडियाने आपल्या गृहकर्जाचा दर ९.५ टक्क्यांवरून ९.४ टक्के केला असून, १५ वर्षे मुदतीच्या ५0 लाखांच्या कर्जावरील मासिक हप्ता ३00 रुपयांनी कमी झाला आहे.
डिसेंबर २0१५ मध्ये रिझर्व्ह बँकेने एक आदेश जारी करून व्याजदर ठरविण्यासाठी ‘मार्जिनल कॉस्ट आॅफ फंड’ (एमसीएलआर) नावाची नवी पद्धती लागू केली.
या पद्धतीमुळे व्याजदर ठरविण्याचा व्यावसायिक बँकांचा एकाधिकार संपुष्टात आला. भांडवली खर्चावर बँकांना व्याजदर ठरविणे बंधनकारक झाले. व्याजदरांचा कालबद्ध आढावा घेणेही बँकांना बंधनकारक झाले. याचाच अर्थ रिझर्व्ह बँकेने व्याजदरांत कपात केल्यास व्यावसायिक बँकांनाही कपात करणे आवश्यक झाले.(वृत्तसंस्था)
अशी काम करील नवी पद्धती
येत्या ५ एप्रिल रोजी रिझर्व्ह बँक पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. त्यात रेपो दर आणि अन्य धोरणात्मक दरांत कपात झाल्यास बँकांचे व्याजदर पुन्हा कमी होऊ शकतात. नव्या धोरणानुसार, बँकांना आता दरमहा व्याजदरांचा आढावा घ्यावा लागेल.
जुन्या कर्जदारांना अल्प शुल्कावर नवीन व्याजदर लागू होऊ शकेल. १ एप्रिलला कर्ज घेणाऱ्यांना नव्या ९.३ एमसीएलआरने कर्ज मिळेल. समजा एखाद्याने पुढील महिन्यात कर्ज घेतले. तथापि, तोपर्यंत जर व्याजदर कमी झाले असतील, तर त्याला नव्या स्वस्त व्याजदराने कर्ज मिळेल.
एप्रिलमध्ये कर्ज घेणाऱ्यांना लगेच त्याचा लाभ मिळणार नाही. त्यासाठी त्यांना आणखी तीन तिमाहींची वाट पाहावी लागेल.
भांडवली खर्च दर महिन्याला बदलल्यास नव्या व्यवस्थेनुसार १२ महिन्यांत १२ व्याजदर आढावे होतील. त्यानुसार तेवढेच व्याजांचे दर होतील.
गृहकर्जाचा हप्ता अखेर झाला कमी
व्यावसायिक बँकांचे व्याजदर ठरविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शुक्रवारी १ एप्रिलपासून गृहकर्जाचे हप्ते कमी होण्यास
By admin | Updated: April 2, 2016 01:50 IST2016-04-02T01:50:24+5:302016-04-02T01:50:24+5:30
व्यावसायिक बँकांचे व्याजदर ठरविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शुक्रवारी १ एप्रिलपासून गृहकर्जाचे हप्ते कमी होण्यास
