Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशात आयटी क्षेत्रात मिळते सर्वाधिक वेतन

देशात आयटी क्षेत्रात मिळते सर्वाधिक वेतन

भारतात आयटी क्षेत्रात सर्वाधिक वेतन मिळत असल्याची बाब समोर आली आहे. तरीही ५७ टक्के कर्मचारीच आपल्या पगारावर समाधानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

By admin | Updated: February 16, 2016 03:23 IST2016-02-16T03:23:07+5:302016-02-16T03:23:07+5:30

भारतात आयटी क्षेत्रात सर्वाधिक वेतन मिळत असल्याची बाब समोर आली आहे. तरीही ५७ टक्के कर्मचारीच आपल्या पगारावर समाधानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Highest pay in IT sector in the country | देशात आयटी क्षेत्रात मिळते सर्वाधिक वेतन

देशात आयटी क्षेत्रात मिळते सर्वाधिक वेतन

नवी दिल्ली : भारतात आयटी क्षेत्रात सर्वाधिक वेतन मिळत असल्याची बाब समोर आली आहे. तरीही ५७ टक्के कर्मचारीच आपल्या पगारावर समाधानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आयटीत एका तासासाठी साधारणपणे ३४६ रुपये मिळत आहेत. मॉन्स्टर सॅलरी इंडेक्सच्या अहवालानुसार बँकेत, तसेच आर्थिक व विमा क्षेत्रात त्याखालोखाल तासाचा पगार ३०० रुपये आहे. निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांत हा पगार तासाला २५४ रुपये आहे. मान्स्टर डॉट कॉमचे मुख्य संचालक संजय मोदी म्हणाले की, आयटी व बँक, विमा हे क्षेत्र भारतातील सर्वाधिक वेतन देणारे क्षेत्र आहे; मात्र या क्षेत्रातील कर्मचारीही आपल्या वेतनाबाबत समाधानी नाहीत.
आयटी क्षेत्राच्या तुलनेत अन्य खासगी क्षेत्रात मिळणारे वेतन हे कमी असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Highest pay in IT sector in the country