नरपालिका अभियंत्यांना सरकारी अभियंत्यांएवढे वेतन द्याउच्च न्यायालय : तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश खामगाव (जि़ बुलडाणा) : राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अभियंत्यांच्या तुलनेने कामाचा ताण जास्त आणि वेतन कमी अशी परिस्थिती असलेल्या नगरपालिका अभियंत्यांना राज्य शासनाच्या अभियंत्यांएवढे वेतन देण्यासाठी तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. समान अभियांत्रिकी शिक्षण, कामाचे समान स्वरूप, वाढत्या शहरीकरणामुळे विविध योजना व सुविधांची वाढत असलेली व्याप्ती पाहता नगरपालिका अभियंत्यांना विविध तांत्रिक जबाबदार्यांसह जनसंपर्क, व्यवस्थापन आदी जबाबदार्याही पार पाडाव्या लागतात. वेतन मात्र राज्य शासनाच्या इतर विभागातील अभियंत्यांच्या तुलनेत कमी दिले जाते. महाराष्ट्र राज्य नगर परिषद अभियंता संघाने तीन वर्षांपूर्वी नगर विकास विभागाच्या संचालकांना हा अन्याय दूर करण्याची मागणी केली होती. दरम्यान, नगरपालिका प्रशासन संचालकांनी अभियंत्यांच्या मागण्या रास्त असल्याचा प्रस्ताव विविध संदर्भासह नगर विकास विभागाकडे दोन वर्षांपूर्वी सादर केला होता. हा प्रस्तावही राज्य शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे अभियंता संघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अनूप मोहता, एन.एम.जामदार यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना या प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. (प्रतिनिधी)़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़कोट..नगर पालिका अभियंत्यांवरील अन्यायाची न्यायालयाने दखल घेतली आहे. राज्य सरकारी अभियंत्यांप्रमाणे समान वेतनर्शेणी मिळावी, ही रास्त मागणी आहे. यामुळे राज्यातील 234 नगरपालिकांमध्ये कार्यरत अभियंत्यांना समान वेतनवाढीबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे.- संजय मोकासरे, प्रदेश उपाध्यक्ष,नगरपरिषद अभियंता संघ
नगरपालिका अभियंत्यांना सरकारी अभियंत्यांएवढे वेतन द्या उच्च न्यायालय : तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश
नगरपालिका अभियंत्यांना सरकारी अभियंत्यांएवढे वेतन द्या
By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST2014-11-21T22:38:20+5:302014-11-21T22:38:20+5:30
नगरपालिका अभियंत्यांना सरकारी अभियंत्यांएवढे वेतन द्या
