कडतरीसूरज पवार मडगाव कुडतरी मतदारसंघात निवडणुकीसाठी पडद्याआड हालचालींना एव्हाना सुरुवात झाली आहे. विद्यमान आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सलग दोनदा येथे विजय प्राप्त केला आहे. सेव्ह गोवा पक्षाच्या तिकिटावर त्यांनी दिग्गज फ्रान्सिस सार्दिन यांचा पाडाव केला होता. त्यानंतर मागच्या निवडणुकीत लॉरेन्स यांनी भाजपाचा पाठिंबा लाभलेला व अपक्ष उमेदवार डॉमनिक गावकर यांचा पराभव केला होता. सध्या लॉरेन्स हॅट्रटिकच्या प्रयत्नात आहेत. त्यांना या पराक्रमापासून वंचित करण्यासाठी विरोधकांचा प्रयत्न आहे. हा कृषीप्रधान मतदारसंघ आहे. या मतदारसंघाला शहरीकरणाची लागण लागलेली नाही. लॉरेन्स यांनी या मतदारसंघात पकड घ केली आहे. स्वत: उच्चवर्णिय कुटुंबात जन्मलेले भाटकार असलेलेही ते असामी लोकांशी मिळून मिसळून वागत आले आहेत. त्यामुळे त्यांना येथे मोठा जनाधार आहे, त्यांचा त्यांना मागच्या दोन्हीवेळच्या निवडणुकीत फायदा झालेला आहे. मतदारांशी सततचा संपर्क, ही आतापर्यंत लॉरेन्स यांची जमेची बाजू आहे. त्याचप्रमाणे मतदारसंघातील तसेच राज्यातील समस्यांवर आवाज काढून माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहचविण्याचे तंत्र त्यांना चांगलेच अवगत आहे.वरकरणी लॉरेन्स यांना विरोधक नसल्याचे दिसत असले तरी ही बाब खरी नाही. अनेकजण आमदार बनण्याची स्वप्ने बाळगून आहेत. राजकारणातूनही संपविणार्या लॉरेन्सला धडा शिकविण्यासाठी फ्रान्सिस सार्दिन प्रयत्नशील आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सार्दिन यांना दक्षिण गोव्याची काँग्रेसने उमेदवारी डावलून ऐनवेळी लॉरेन्स यांना तिकीट दिले होते. ही गोष्ट सार्दिन कसे विसरतील? स्वत:ला नाही तर पुत्र शालोमला तिकीट मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहील, यात दुमत नसावे. दुसरीकडे डॉम्निक गावकर येथे कोणत्याही स्थितीत जिंकून येण्यासाठी प्रयत्नात आहेत. मागच्या निवडणुकीत भाजपने त्यांना पाठिंबा देऊनही ते हरले होते. या मतदारसंघात मडगाव पालिकेचे गृहनिर्माण वसाहतीतील दोन प्रभाग जोडल्याने भाजपा मतदारांची संख्या आता येथे बर्यापैकी झालेली आहे, त्यामुळे भाजपाच्या तिकिटावरही अनेकजणांचा डोळा आहे. मात्र, कुडतरी हा ख्रिस्तीबहुल असल्याने व सध्या राज्यात भाजप व गोविपामध्ये युती असल्याने या मतदारसंघात भाजपा येथे उमेदवार ठेवेल की गोविपासाठी ही जागा सोडेल, हा प्रश्न आहे. यदा कदाचित गोविपाशी आगामी निवडणुकीच्यावेळी युती तुटली तर येथे भाजपा उमेदवार उभा करू शकतो. मात्र, या जर तरच्या गोष्टी आहेत, आताच ठामपणे काहीही सांगता येत नसल्याने भाजपाच्या तिकिटासाठी इच्छुक असलेले काहीजण तिकिटाबाबत आपले विचार बोलून दाखवत नाही. डॉमनिक गावकर हे पुन्हा एकदा भाजपाच्या पाठिंब्यावर कुडतरीत उभे राहू शकतात. हल्लीच दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत राय मतदारसंघातून गावकर यांच्या पत्नी फातिमा गावकर या निवडून आलेल्या आहेत. राय हा कुडतरी मतदारसंघात मोडत आहे. फातिमा गावकर या गोविपाच्या उमेदवार होत्या. पत्नीला जिंकून आणून डॉमनिक गावकर यांनी खूप काही सांगितले आहे. आम आदमी पक्षही येथून निवडणूक लढवू शकतो. पक्षाचे युवा कार्यकर्ते राजू अय्यर हे या पक्षाचे उमेदवार ठरू शकतात. गावातील समस्यांवर आवाज ते उठवित आहे. चौकट...तर गणिते बिघडणारपुढील निवडणुकीत हा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव होईल, अशीही येथे वंदता आहे. या मतदारसंघात या घटकांची संख्या मोठी आहे. तसे झाले तर सगळीच गणिते बिघडू शकतात.मतदारसंघ राखीव झाल्यास...विद्यमान आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा पत्ता आपोआप कट होऊ शकतो. तसेच सार्दिन पिता-पुत्र ही रेसही बाद होऊ शकतात. जर हा मतदारसंघ राखीव झाला तर राशोलचे सरपंच जोसेफ वाझ घोडे पुढे दामटू शकतात. अनेक वर्षे ते काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक आहेत. त्यांनीही संकेत दिलेले आहेत.ढँङ्म३ङ्म : 0205-टअफ-04 - कॅप्शन: आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स. ढँङ्म३ङ्म : 0205-टअफ-05- कॅप्शन: डॉमनिक गावकर.
(हॅलो पान १ : बुधवारचा ६ मे चा अंक ) पडद्यामागे हालचाली
कुडतरी
By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:55+5:302015-05-05T01:21:55+5:30
कुडतरी
