Lokmat Money > बिझनेस न्यूज > हॅलो २ - तुयेत खंडित विजेने नागरिक हैराण

हॅलो २ - तुयेत खंडित विजेने नागरिक हैराण

तुये : तुये गावात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार सुरू असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. तुये गाव मांद्रे मतदारसंघात आहे. मांद्रे मतदारसंघाचे आमदार मुख्यमंत्री असूनही या गावात वारंवार वीज जाण्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खंडित विजेमुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे महिला, पुरुषांना पाण्यासाठी विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. प्रत्येकाची स्वत:ची विहीर नसल्यामुळे पायपीट करत दुसर्‍या विहिरींचे पाणी आणावे लागत असल्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचा परिणाम दैनंदिन कामकाजावरही होत आहे. त्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. धारगळ, पार्से, विर्नोडा या पेडणे तालुक्यातील गावांत विजेची समस्या तीव्र होऊ लागली आहे. याचा फटका व्यावसायिकांनाही बसत आहे. याची सरकारने दखल घेण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली आहे. आगामी

By admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:33+5:302015-05-05T01:21:33+5:30

तुये : तुये गावात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार सुरू असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. तुये गाव मांद्रे मतदारसंघात आहे. मांद्रे मतदारसंघाचे आमदार मुख्यमंत्री असूनही या गावात वारंवार वीज जाण्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खंडित विजेमुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे महिला, पुरुषांना पाण्यासाठी विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. प्रत्येकाची स्वत:ची विहीर नसल्यामुळे पायपीट करत दुसर्‍या विहिरींचे पाणी आणावे लागत असल्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचा परिणाम दैनंदिन कामकाजावरही होत आहे. त्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. धारगळ, पार्से, विर्नोडा या पेडणे तालुक्यातील गावांत विजेची समस्या तीव्र होऊ लागली आहे. याचा फटका व्यावसायिकांनाही बसत आहे. याची सरकारने दखल घेण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली आहे. आगामी

Hello 2 - The people who are frustrated by the villagers | हॅलो २ - तुयेत खंडित विजेने नागरिक हैराण

हॅलो २ - तुयेत खंडित विजेने नागरिक हैराण

ये : तुये गावात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार सुरू असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. तुये गाव मांद्रे मतदारसंघात आहे. मांद्रे मतदारसंघाचे आमदार मुख्यमंत्री असूनही या गावात वारंवार वीज जाण्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खंडित विजेमुळे पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे महिला, पुरुषांना पाण्यासाठी विहिरीवर जाऊन पाणी आणावे लागत आहे. प्रत्येकाची स्वत:ची विहीर नसल्यामुळे पायपीट करत दुसर्‍या विहिरींचे पाणी आणावे लागत असल्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचा परिणाम दैनंदिन कामकाजावरही होत आहे. त्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. धारगळ, पार्से, विर्नोडा या पेडणे तालुक्यातील गावांत विजेची समस्या तीव्र होऊ लागली आहे. याचा फटका व्यावसायिकांनाही बसत आहे. याची सरकारने दखल घेण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर या स्थितीचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ज्याप्रमाणे जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला अनपेक्षित अपयशास सामोरे जावे लागले, त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही तशी स्थिती होण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली. (वार्ताहर)

Web Title: Hello 2 - The people who are frustrated by the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.