सखळीत समूह गीत गायन कार्यशाळासाखळी : गोकुळवाडी-साखळी येथील प्रोग्रेस माध्यमिक विद्यालयात तीनदिवसीय समूह गीत गायन स्पर्धा कार्यशाळा नुकतीच झाली. विद्यार्थ्यांना समूहगीत गायनाचे तज्ज्ञ दिलीप कुंडईकर यांनी प्रशिक्षण दिले.या कार्यशाळेत 85 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, तर तीन दिवसांत 15 समूहगीतांचे 5वी ते 7वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.कार्यशाळेचे आयोजन विद्यालयातील मास्टर दत्ताराम नाट्य संगीत कला मंचच्या विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यशाळेला विद्यालयाचे शिक्षक प्रभाकर माजीक, शिल्पा पेडणेकर, तेजा हणजूणकर, दामोदर नाईक आणि कार्यक्रमाचे समन्वयक साहाय्यक मुख्याध्यापक विजयकुमार वेरेकर यांचे योगदान लाभले. प्रथम किंजवडेकर (हार्मोनियम) आणि अवधूत मराठे व वासुदेव च्यारी (तबला) या विद्यार्थ्यांनी साथसंगत केली. (प्रतिनिधी)फोटो ओळी-प्रोग्रेस माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित समूहगीत गायन कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी आपली प्रशस्तीपत्रके दाखविताना. सोबत डावीकडून शिक्षक दामोदर नाईक, विजयकुमार वेरेकर, प्रशिक्षक दिलीप कुंडईकर, शिल्पा पेडणेकर व इतर शिक्षिका. (छाया : संतोष मळीक)
हॅलो 1- साखळीत समूह गीत गायन कार्यशाळा
साखळीत समूह गीत गायन कार्यशाळा
By admin | Updated: August 27, 2014 21:30 IST2014-08-27T21:30:25+5:302014-08-27T21:30:25+5:30
साखळीत समूह गीत गायन कार्यशाळा
