खेट्री: पातूर तालुक्यातील खेट्री येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
खेट्री येथे पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो रुपये खर्चून, जलकुंभ बांधण्यात आले आणि विहिरीही खोदण्यात आल्या; परंतु त्यामध्ये पाणीच नाही. पावसाळा सुरू होऊन १५ दिवस होत आले तरी, उन्हाचा पारा कमी झाला नसल्याने या भागातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे गावातील विहिरीचे पाणी खूप कमी झाले असून, पाण्यासाठी महिलांसह लहान मुलांना भर उन्हात भटकावे लागत आहे. या संदर्भात खेट्रीच्या सरपंच अनिता गवई यांच्याक डे चौकशी केली असता पाणीपुरवठा योजनेंतर्गत निर्माण झालेला वाद न्यायप्रविष्ट असून, न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत पाणीपुरवठा सुरू होऊ शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
खेट्री येथे भीषण पाणीटंचाई
खेट्री: पातूर तालुक्यातील खेट्री येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
By admin | Updated: June 24, 2014 16:27 IST2014-06-23T22:44:19+5:302014-06-24T16:27:49+5:30
खेट्री: पातूर तालुक्यातील खेट्री येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.