Lokmat Money > बिझनेस न्यूज > सधन लोकांनी एलपीजी सबसिडी सोडावी

सधन लोकांनी एलपीजी सबसिडी सोडावी

सधन लोकांनी आणखी उदारपणा दाखवत एलपीजी सबसिडीचा त्याग करावा, असे आवाहन केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. एका सर्वेक्षणानुसार सधन घटकातील

By admin | Updated: March 15, 2016 02:14 IST2016-03-15T02:14:29+5:302016-03-15T02:14:29+5:30

सधन लोकांनी आणखी उदारपणा दाखवत एलपीजी सबसिडीचा त्याग करावा, असे आवाहन केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. एका सर्वेक्षणानुसार सधन घटकातील

Healthy people should quit LPG subsidy | सधन लोकांनी एलपीजी सबसिडी सोडावी

सधन लोकांनी एलपीजी सबसिडी सोडावी

नवी दिल्ली : सधन लोकांनी आणखी उदारपणा दाखवत एलपीजी सबसिडीचा त्याग करावा, असे आवाहन केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले. एका सर्वेक्षणानुसार सधन घटकातील लोकांचे या योजनेतील योगदान निराशाजनक असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
टॅलेन्टनॉमिक्स-इक्रियरच्या वतीने आयोजित शाश्वत विकासासाठी महिलांचे सशक्तीकरण या परिषदेत ते बोलत होते. स्वेच्छेने एलपीजी सबसिडीचा त्याग करणाऱ्या लोकांची संख्या किती, यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आले. यात एक लाख लोकांचा समावेश करण्यात आला. या सर्वेक्षणानुसार वार्षिक १० लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असणाऱ्या लोकांपैकी फक्त तीन टक्क्यांनी एलपीजी सबसिडी सोडली.
अंदाजपत्रकीय तरतूद मर्यादित आहे. हे ध्यानात घेतले पाहिजे. कोणाला सबसिडी द्यावी? सधन लोकांनी सबसिडी घ्यावी का? गरीब घटकांतील महिलांनाच सबसिडी द्यावी का? याचा विचार करायला हवा. शाश्वत विकास आणि महिला सशक्तीकरणाशी हा मुद्दा निगडित आहे.


वार्षिक १० लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्यांनी एलपीजी सबसिडी सोडावी, असे स्पष्ट निर्देश आहेत; परंतु सेवानिवृत्त शिक्षक किंवा कर्मचारी यासारखे निम्न-मध्यमवर्गीय लोक असे करीत आहेत. आतापर्यंत ८५ लाख लोकांनी स्वेच्छेने एलपीजी सबसिडी सोडली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

५० टक्के लाभार्थी असतील महिला...
पेट्रोलियम मंत्रालयाने उज्ज्वला योजनेतहत पुढील तीन वर्षे दारिद्र्यरेषेखालील पाच कोटी लोकांना एलपीजी जोडणी देण्याचे ठरविले आहे. या योजनेतहत अशा कुटुंबातील महिलांच्या नावे एलपीजी कनेक्शन दिले जाईल.
प्रत्येक जिल्ह्यासाठी एका तेल विपणन कंपनीवर ही जबाबदारी सोपविण्यात येईल आणि ५० टक्के लाभार्थी महिला असतील. ही गावे धुररहित करून १०० टक्के एलपीजीने जोडली जातील. यासाठी सरकारने २ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Web Title: Healthy people should quit LPG subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.