Lokmat Money > बिझनेस न्यूज > हेतूत: कर्ज बुडविणा:यांची नव्याने व्याख्या करणार

हेतूत: कर्ज बुडविणा:यांची नव्याने व्याख्या करणार

‘हेतुत: कर्ज बुडविणा:या थकबाकीदार (विलफुल डिफॉल्टर) कर्जदारांची नव्याने व्याख्या करण्याबाबत रिझव्र्ह बँक विचार करीत असल्याचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी सांगितले.

By admin | Updated: October 2, 2014 02:16 IST2014-10-02T02:16:37+5:302014-10-02T02:16:37+5:30

‘हेतुत: कर्ज बुडविणा:या थकबाकीदार (विलफुल डिफॉल्टर) कर्जदारांची नव्याने व्याख्या करण्याबाबत रिझव्र्ह बँक विचार करीत असल्याचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी सांगितले.

He said: Debt divergence: To redefine them | हेतूत: कर्ज बुडविणा:यांची नव्याने व्याख्या करणार

हेतूत: कर्ज बुडविणा:यांची नव्याने व्याख्या करणार

मुंबई : ‘हेतुत: कर्ज बुडविणा:या थकबाकीदार (विलफुल डिफॉल्टर) कर्जदारांची नव्याने व्याख्या करण्याबाबत रिझव्र्ह बँक विचार करीत असल्याचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी सांगितले. त्यामुळे अशा कंपन्यांच्या संचालकांना या कक्षेत आणणो शक्य होईल,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोलकाता न्यायालयाने यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत. थकबाकीदार कंपनीच्या सर्व संचालकांचा थकबाकीदारांमध्ये समावेश करावा का, असा मुद्दा या न्यायालयाने उपस्थित केला आहे.
पतधोरणाच्या आढाव्यानंतर बोलताना राजन यांनी हेतुपुरस्सर कर्ज बुडविणा:या थकबाकीदारांबाबतची व्याख्या बदलण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. एखाद्या कर्जदाराने ठरलेल्या उद्दिष्टासाठी कर्जाऊ रकमेचा वापर न करणो किंवा कर्ज फेडण्याची क्षमता असतानाही ते न फेडल्यास तो सध्याच्या व्याख्येनुसार हेतुपुरस्सर थकबाकीदार ठरतो, तसेच कर्जदाराने बँकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेची बँकेला माहिती न देता परस्पर विक्री केल्यास तो थकबाकीदार हेतुपुरस्सर थकबाकीदार म्हणून ओळखला जातो. (प्रतिनिधी)
 
जे थकबाकीदार सहकार्य करीत नाहीत, अशांबाबत निर्णय करता यावा, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत, असेही राजन यांनी सांगितले.

 

Web Title: He said: Debt divergence: To redefine them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.