Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘एचडीएफसी’ तीन मिनिटांत देणार तारण कर्ज

‘एचडीएफसी’ तीन मिनिटांत देणार तारण कर्ज

डिजिटलायझेशनच्या वेगवान युगात ‘एचडीएफसी’ बँकेने भक्कम पाऊल टाकत, ग्राहकांना ‘लोन अगेंस्ट सिक्युरिटीज’ (एलएएस) सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

By admin | Updated: March 16, 2017 00:46 IST2017-03-16T00:46:39+5:302017-03-16T00:46:39+5:30

डिजिटलायझेशनच्या वेगवान युगात ‘एचडीएफसी’ बँकेने भक्कम पाऊल टाकत, ग्राहकांना ‘लोन अगेंस्ट सिक्युरिटीज’ (एलएएस) सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

HDFC will offer mortgage loan in three minutes | ‘एचडीएफसी’ तीन मिनिटांत देणार तारण कर्ज

‘एचडीएफसी’ तीन मिनिटांत देणार तारण कर्ज

मुंबई : डिजिटलायझेशनच्या वेगवान युगात ‘एचडीएफसी’ बँकेने भक्कम पाऊल टाकत, ग्राहकांना ‘लोन अगेंस्ट सिक्युरिटीज’ (एलएएस) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉसिटरी लिमिटेडच्या (एनएसडीएल) सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांचे समभाग तारण ठेवून केवळ तीन मिनिटांत कर्ज उपलब्ध होणार आहे. १ ते २० लाखांपर्यंत कर्ज झटक्यात मिळणार असल्याने तातडीच्या आर्थिक अडचणींमध्ये ग्राहकांना याचा मोठा उपयोग होईल, असा विश्वास ‘एचडीएफसी’च्या तारण कर्ज विभागाचे भारतातील प्रमुख अरविंद कपिल यांनी व्यक्त केला.
अरविंद कपिल आणि एनएसडीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जी. व्ही. नागेश्वरा राव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: HDFC will offer mortgage loan in three minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.