Lokmat Money > बिझनेस न्यूज > नाशकात वर्षभर चालणार हरित कुंभचा जागर

नाशकात वर्षभर चालणार हरित कुंभचा जागर

वर्षभर चालणार हरित कुंभचा जागर

By admin | Updated: September 7, 2014 00:04 IST2014-09-07T00:04:00+5:302014-09-07T00:04:00+5:30

वर्षभर चालणार हरित कुंभचा जागर

Harit Kumbha Jagar runs throughout the year in Nashik | नाशकात वर्षभर चालणार हरित कुंभचा जागर

नाशकात वर्षभर चालणार हरित कुंभचा जागर

्षभर चालणार हरित कुंभचा जागर
कृती आराखड्याचे अनावरण : नदी प्रदूषणविरहित करण्याचे आव्हान
नाशिक : कुंभमेळ्याच्या निमित्ताने येथे वर्षभर भाविकांचा राबता राहणार असून, या कालावधीत गोदावरी नदी तसेच शहराचे पर्यावरण अबाधित राहावे यासाठी ग्रीन कुंभ संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखडा तसेच बोधचिन्हाचे अनावरण महापौर अँड. यतिन वाघ व विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रीन कुंभचे प्रत्यक्ष कामकाज चालावे, यासाठी महात्मा फुले कलादालनात प्रत्यक्ष कार्यालय सुरू करण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ करण्यात आला. विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, मेळा अधिकारी महेश पाटील, रघुनाथ गावडे, कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती, भक्तिचरणदास आदी उपस्थित होते. गोदावरी नदी प्रदूषणविरहित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नदीचे प्रदूषण तात्पुरते दूर करण्यापेक्षा कायमस्वरूपी नष्ट झाले पाहिजे, यासाठी नदीत कायमस्वरूपी जैविक प्रवाह टिकवून ठेवला पाहिजे, असे मत डवले यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Harit Kumbha Jagar runs throughout the year in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.