नशिक : हातमाग कारागिरांनी उत्पादित केलेला माल नाशिककरांना थेट उपलब्ध झाला आहे. वीव्हज या हैदराबाद येथील संस्थेने इंद्रप्रस्थ हॉलमध्ये आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ही संधी मिळत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज करण्यात आले.वीव्हजतर्फे आयोजित या प्रदर्शनामध्ये देशाच्या विविध भागांतील हातमाग उत्पादकांनी तयार केलेला माल थेट विक्रीसाठी आला असल्याने ग्राहकांचा फायदा होणार असल्याचे व्यवस्थापक टी. श्रीनिवास यांनी सांगितले. या प्रदर्शनात देशाच्या विविध राज्यांमधून आलेल्या कारागिरांचे सुमारे ५० स्टॉल्स आहेत. यामध्ये सिल्क, साड्या, सुटिंग, शर्टिंग, ड्रेस मटेरियल, दुपे, स्ट्रोल, मुलांचे कपडे, गृह सजावटीसाठीचे साहित्य, चादरी, शाली अशा विविध वस्तू आहेत. येत्या १४ तारखेपर्यंत हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ९ या काळामध्ये सुरू राहणार आहे. नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही श्रीनिवास यांनी केले आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)फोटो एनएसके एडीटवर वीव्हज एक्झिबिश्न या नावाने आला आहे.
हातमाग कारागिरांचा माल थेट नाशिकमध्ये
नाशिक : हातमाग कारागिरांनी उत्पादित केलेला माल नाशिककरांना थेट उपलब्ध झाला आहे. वीव्हज या हैदराबाद येथील संस्थेने इंद्रप्रस्थ हॉलमध्ये आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ही संधी मिळत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज करण्यात आले.
By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST2014-09-11T22:31:25+5:302014-09-11T22:31:25+5:30