Lokmat Money > बिझनेस न्यूज > एसबीआयच्या व्याजदरात अर्ध्या टक्क्याची कपात

एसबीआयच्या व्याजदरात अर्ध्या टक्क्याची कपात

भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) १७९ दिवसांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात अर्ध्या टक्क्याची कपात केली आहे.

By admin | Updated: July 16, 2014 01:46 IST2014-07-16T01:46:32+5:302014-07-16T01:46:32+5:30

भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) १७९ दिवसांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात अर्ध्या टक्क्याची कपात केली आहे.

Half-a-cut reduction in SBI interest rates | एसबीआयच्या व्याजदरात अर्ध्या टक्क्याची कपात

एसबीआयच्या व्याजदरात अर्ध्या टक्क्याची कपात

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) १७९ दिवसांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात अर्ध्या टक्क्याची कपात केली आहे.
७ ते १७९ दिवसांच्या मुदत ठेवीवरील व्याज दर ७.५ टक्क्यांवरून ७ टक्के करण्यात आला आहे. १८ जुलैपासून नवे व्याजदर लागू होतील. एक कोटीपेक्षा जास्त रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याज दरांचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. पहिला टप्पा ७ ते ६0 दिवसांचा असून या वरील व्याजदर 0.२५ टक्के कमी करून ६.२५ टक्के करण्यात आला आहे.

Web Title: Half-a-cut reduction in SBI interest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.