वॉशिंग्टन : अमेरिकेने एच-१ बी व्हिसाधारकांच्या जोडीदारास काम करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा हजारो भारतीयांना फायदा होणार आहे.
सध्याच्या कायद्यानुसार, एच १-बी व्हिसाधारकांना त्यांच्या जोडीदारास (पती, पत्नी) येथे काम करण्याची परवानगी नव्हती. उल्लेखनीय बाब म्हणजे, यात भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. अमेरिकी नागरिक आणि स्थलांतर सेवा अर्थात यूएससीआयएसद्वारे येत्या २६ मेपासून एच १-बी धारकांचे पती-पत्नी यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
यूएससीआयएसद्वारा ‘फॉर्म १-७६५’ला मंजुरी मिळाल्यावर एच-४ परावलंबी पती-पत्नी रोजगार ओळखपत्र प्राप्त करू शकतील. या कार्डच्या माध्यमातून एच-१ बी व्हिसाधारकाच्या पती-पत्नीस अमेरिकेत नोकरी करण्याचा मार्ग मोकळा होईल.
नव्या बदलानंतर पहिल्या वर्षी सुमारे १,७९,६०० नागरिक या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. यानंतर वार्षिक ५५,००० अर्ज प्राप्त होतील, असे भाकीत अमेरिकी यंत्रणेने केले आहे. अमेरिका सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचा येथील अनिवासी भारतीयांनी स्वागत केले आहे.
दक्षिण आशियाई अमेरिकींची संस्था साल्टने (साऊथ एशिअन अमेरिकन्स लीडिंग टुगेदर) एका निवेदनात सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
कायदेशीर स्थायी नागरिकत्व असलेल्या एच-१ बी व्हिसाधारकांच्या जोडीदाराला म्हणजेच एच-१ प्रकारच्या व्हिसाधारकांना काही अटींची पूर्तता केल्यानंतर येथे काम करण्याची परवानगी मिळणार आहे, तर काही बिगर-स्थलांतरित एच-१ बी व्हिसाधारकांच्या जोडीदाराला आय-१४० फॉर्मची मंजुरी घेणे गरजेचे असून यासाठी कमीत कमी एक वा तीन अटींची पूर्तता करावी लागणार आहे.
अमेरिकेने इमिग्रेशनशी संबंधित कायद्यात गेल्या काही वर्षांपासून टप्प्याटप्प्याने बदल चालविला
आहे. (वृत्तसंस्था)
एच-१बी : जोडीदारास कामाची संधी
अमेरिकेने एच-१ बी व्हिसाधारकांच्या जोडीदारास काम करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा हजारो भारतीयांना फायदा होणार आहे.
By admin | Updated: February 26, 2015 00:28 IST2015-02-26T00:28:32+5:302015-02-26T00:28:32+5:30
अमेरिकेने एच-१ बी व्हिसाधारकांच्या जोडीदारास काम करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा हजारो भारतीयांना फायदा होणार आहे.
