Lokmat Money > बिझनेस न्यूज > महावितरणचा पदभार गुप्तांनी स्वीकारला

महावितरणचा पदभार गुप्तांनी स्वीकारला

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार ओ.पी.गुप्ता यांनी नुकताच स्वीकारला. अजय मेहता यांच्याकडून त्यांनी नव्या पदाची सुत्रे स्वीकारली.

By admin | Updated: January 7, 2015 23:37 IST2015-01-07T23:37:40+5:302015-01-07T23:37:40+5:30

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार ओ.पी.गुप्ता यांनी नुकताच स्वीकारला. अजय मेहता यांच्याकडून त्यांनी नव्या पदाची सुत्रे स्वीकारली.

Gupta accepted the charge of MSEDCL | महावितरणचा पदभार गुप्तांनी स्वीकारला

महावितरणचा पदभार गुप्तांनी स्वीकारला

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार ओ.पी.गुप्ता यांनी नुकताच स्वीकारला. अजय मेहता यांच्याकडून त्यांनी नव्या पदाची सुत्रे स्वीकारली. यापूर्वी गुप्ता हे बेस्टचे महाव्यवस्थापक होते.
मॅकेनिकल इंजिनियरिंग विषयात पदवी घेतलेले ओ.पी.गुप्ता हे १९९२ च्या भारतीय प्रशासन सेवेच्या (आयएएस) तुकडीचे अधिकारी आहेत. यापूर्वी, त्यांनी एस.टी. महामंडळ, महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, अमरावती व सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच अकोला जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदांवर काम केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gupta accepted the charge of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.