लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जीएसटी अंतर्गत सोन्यावरील करात मोठी वाढ करण्यात आल्यामुळे देशात सोन्याची तस्करी तसेच बेकायदेशीर खरेदी वाढू शकते, अशी भीती सराफा बाजाराशी संबंधित सूत्रांनी व्यक्त केली आहे.
आतापर्यंत सोन्यावर १.२ टक्केच कर होता. जीएसटीमध्ये तो ३ टक्के करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सराफाबाजारातील काळाबाजार वाढण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. मुंबईच्या जव्हेरी बाजारातील खरेदीदाराने सांगितले की, ३ टक्के कर खूपच जास्त आहे. एवढा कर भरण्यापेक्षा मी विनापावतीची खरेदी करण्यास प्राधान्य देईन. अशा व्यवहारास ज्वेलरांचीही हरकत नाही.
भारताच्या पूर्वभागातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोलकाता शहरातील सोन्याची होलसेल व्यापारी संस्था जे जे गोल्ड हाउसचे मालक हर्षद अजमेरा यांनी सांगितले की, वाढीव करामुळे छोटे दुकानदार विनापावती विक्री जास्त प्रमाणात करू शकतात. याचा मोठ्या दुकानदारांना फटका बसेल. केवळ १ टक्के कर होता तेव्हाही अनेक लोक तो चुकवून विनापावती खरेदीस प्राधान्य देत होते. आता ३ टक्के कर झाल्यामुळे विनापावती खरेदीचा मोह होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर संस्था वामन हरी पेठेचे संचालक आदित्य पेठे यांनी सांगितले की, जीएसटीच्या करामुळे तस्करीच्या मार्गाने सोने आणणे अधिक फायदेशीर झाले आहे. सरकारने आयात कर कमी करून तस्करी न परवडणारी करायला हवी.
१२0 टन सोन्याची तस्करी झाली असावी
करातील वाढीमुळे सोन्याच्या तस्करीत मोठी वाढ होऊ शकते. भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सोन्याची बाजारपेठ आहे. विशेष म्हणजे भारतातील बहुतांश सोने विदेशातूनच येते. आॅगस्ट २0१३मध्ये सोन्याच्या आयातीवरील कर १0 टक्के करण्यात आला होता. तेव्हापासून तशीही सोन्याची तस्करी वाढलेली आहे. सोन्यावरील आयात कर वाढविण्यात आला होता. त्याचा एक परिणाम म्हणून तस्करीतही वाढ झाली. एका अंदाजानुसार, २0१६मध्ये १२0 टन सोन्याची तस्करी झाली असावी.
जीएसटीमुळे सोने तस्करी, बेकायदा खरेदी वाढेल
जीएसटी अंतर्गत सोन्यावरील करात मोठी वाढ करण्यात आल्यामुळे देशात सोन्याची तस्करी तसेच बेकायदेशीर खरेदी वाढू शकते, अशी भीती
By admin | Updated: July 5, 2017 00:38 IST2017-07-05T00:38:34+5:302017-07-05T00:38:34+5:30
जीएसटी अंतर्गत सोन्यावरील करात मोठी वाढ करण्यात आल्यामुळे देशात सोन्याची तस्करी तसेच बेकायदेशीर खरेदी वाढू शकते, अशी भीती
