Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्यापाऱ्यांना लागू होणाऱ्या जीएसटीतील तरतुदी!

व्यापाऱ्यांना लागू होणाऱ्या जीएसटीतील तरतुदी!

अर्थमंत्री यांनी ३० जूनला मध्यरात्री १२ वाजता जीएसटी लागू झाल्याची घोषणा केली. जीएसटी हा अप्रत्यक्ष कर

By admin | Updated: July 3, 2017 00:30 IST2017-07-03T00:30:08+5:302017-07-03T00:30:08+5:30

अर्थमंत्री यांनी ३० जूनला मध्यरात्री १२ वाजता जीएसटी लागू झाल्याची घोषणा केली. जीएसटी हा अप्रत्यक्ष कर

GST provisions applicable to traders! | व्यापाऱ्यांना लागू होणाऱ्या जीएसटीतील तरतुदी!

व्यापाऱ्यांना लागू होणाऱ्या जीएसटीतील तरतुदी!

- सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा,
१ जुलै २०१७ पासून जीएसटी
लागू झाला. तर आज याविषयी माहिती सांग.
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, माननीय राष्ट्रपती, मा. पंतप्रधान आणि मा. अर्थमंत्री यांनी ३० जूनला मध्यरात्री १२ वाजता जीएसटी लागू झाल्याची घोषणा केली. जीएसटी हा अप्रत्यक्ष कर कायद्यातील सर्वात मोठा बदल आहे. जीएसटी हा लहान व्यापाऱ्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत सर्व स्तरांवर लागू झाला आहे. प्रत्येक व्यापाऱ्याने कायद्याच्या तरतुदी समजून व्यापार करणे आवश्यक आहे.


कायदा समजून घ्या
जीएसटी हा नवीन कायदा आहे. शासन २२ जून २०१७ पासून अनेक नोटिफिकेशन जारी करत आहे. यामधील सर्व गोष्टी समजावून घेऊन व्यापार करणे आवश्यक आहे.

सर्व व्यापाऱ्यांना
लागू होतील अशा जीएसटीच्या तरतुदी...

जीएसटीविषयीची सर्व माहिती ६६६.ूुीू.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर मिळेल.
आंतरराज्यीय व्यवहारांवर आयजीएसटी आकारला जाईल. तर राज्यांतर्गत व्यवहारांवर सीजीएसटी व एस जीएसटी आकारला जाईल. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांतील व्यवहारांवर यूटीजीएसटी आकारला जाईल.
जीएसटीमध्ये ० टक्के, ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के हे कराचे दर आहेत.
जीएसटीमध्ये पेट्रोलची उत्पादने जसे : पेट्रोलियम क्रु ड, मोटर स्पिरीट, नैसर्गिक वायू, एटीएफ हे तात्पुरते जीएसटीच्या बाहेर ठेवले आहेत.
जीएसटीमध्ये अ‍ॅडव्हान्सवर जीएसटी लागेल. म्हणजेच आपण जर अ‍ॅडव्हान्समध्ये रक्कम दिली तर त्यावरसुद्धा जीएसटी आकारला जाईल.
जर अनोंदणीकृत व्यक्तीकडून वस्तू किंवा सेवा खरेदी केल्या तर रिव्हर्स चार्जच्या तरतुदीद्वारे जीएसटी भरावा लागेल.
रिव्हर्स चार्जच्या तरतुदीमध्ये जर एका दिवसामध्ये रु. ५००० पेक्षा कमी असेल तर त्यावर आरसीएममध्ये कर भरण्याची आवश्यकता नाही.
जीएसटीमध्ये मासिक विवरण (रिटर्न) भरले जाईल.
जीएसटी हा पुरवठ्यावर आधारित आहे. पुरवठा झाला की जीएसटी लागेल.
लहान व्यापारी ज्यांची मागील वार्षिक उलाढाल ७५ लाखांच्या आत असेल तो संयुक्त कर पद्धती लावू शकतो.
कम्पोझिशन स्कीमच्या तरतुदीनुसार उत्पादकाला सीजीएसटी व एसजीएसटी मिळून २ टक्के, रिटेलरला सीजीएसटी व एसजीएसटी मिळून १ टक्का व हॉटेलला सीजीएसटी व एसजीएसटी मिळून ५ टक्के जीएसटी भरावा लागेल.
कच्चा माल, इनपूट सेवा आणि भांडवली वस्तू यांवर भरलेल्या कराचे नोंदणीकृत करपात्र व्यक्तीला आयटीसी मिळेल.
जीएसटीमध्ये अन्न व पेय, अचल संपत्ती, प्रवासी वाहन, आऊट डोअर केटरिंग, सौंदर्य उपचार, आरोग्य सेवा, सौंदर्य प्रसाधने आणि प्लास्टिक सर्जरी, क्लब, आरोग्य केंद्राची सदस्यता शुल्क, प्रवासी वाहने, जीवन विमा, आरोग्य विमा, वैयक्तिक वापराच्या वस्तू, वर्क कॉन्ट्रॅक्ट सेवा यावरचा आयटीसी मिळत नाही.
जीएसटीमध्ये वस्तूंसाठी एचएसएन कोड तर सेवाकरिता एसएसी कोड वापरले जातील. या कोडनुसारच वस्तू व सेवाचे कराचे दर ठरवलेले आहेत.
शेड्युल आणि नोटिफिकेशन नुसारच वस्तू व सेवांवर कराचे दर आकारावे नाहीतर याचे परिणाम भोगावे लागतील.
वस्तू किंवा सेवांचा पुरवठा केल्यावर पुरवठादाराने प्राप्तकर्त्याला टॅक्स इनव्हाइस देणे आवश्यक आहे. टॅक्स इनव्हाइसवर कायद्यात दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती असायला हवी.
जर करदात्याची वार्षिक उलाढाल १.५ कोटीपेक्षा
कमी असेल तर त्याला बिलामध्ये एचएसएन कोड लिहिण्याची गरज नाही. मात्र त्याची वार्षिक उलाढाल रु. १.५ कोटी ते रु. ५ कोटी असेल तर दोन अंकी कोड आणि जर वार्षिक उलाढाल ५ कोटींपेक्षा जास्त असेल तर चार अंकी एचएसएन कोड बिलामध्ये नमूद करावा लागेल. वस्तू जर निर्यात केल्या असतील तर त्याच्या बिलावर आठ अंकी कोड नमूद करावा.
जर एखाद्या व्यक्तीची
वार्षिक उलाढाल रु. २० लाखांच्या वर असेल तर त्या व्यक्तीला नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे.

 

Web Title: GST provisions applicable to traders!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.