कोलकाता : जीएसटीच्या सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चरमधील उणिवांमुळे भारत-बांगलादेश सीमेवरील व्यापारात समस्या निर्माण झाल्या आहेत.
कलकत्ता कस्टम्स हाउस एजन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष सुजित चक्रवर्ती यांनी सांगितले की, १ जुलैपासून आम्हाला समस्यांचा सामना करावा लागत आहे. जीएसटीच्या पायाभूत (इन्फ्रास्ट्रक्चर) सुविधा पुरेशा नाहीत. त्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत. दोन्ही देशांच्या बाजूने माल वाहून नेणाऱ्या ट्रकची वाहतूक मंदावली
आहे.
चक्रवर्ती म्हणाले की, आम्ही आयातीसाठी शिपिंग बिले तसेच प्रवेश बिले मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तथापि, यंत्रणा असंख्य प्रकारच्या त्रुटी (एरर्स) दर्शवीत आहे. क्लीअरन्स प्रक्रिया मंदावली आहे. योग्य मार्गदर्शनही मिळेनासे झाले आहे. पेट्रोपोल येथून बांगलादेशात दररोज ३५0 ट्रक जात होते. ही संख्या आता शंभरवर आली आहे. पेट्रोपोल सीमेवरून १५ हजार कोटींचा व्यापार होतो.
जीएसटीमुळे भारत-बांगला व्यापारात अडथळे
जीएसटीच्या सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चरमधील उणिवांमुळे भारत-बांगलादेश सीमेवरील व्यापारात समस्या निर्माण झाल्या आहेत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2017 00:44 IST2017-07-05T00:44:38+5:302017-07-05T00:44:38+5:30
जीएसटीच्या सॉफ्टवेअर इन्फ्रास्ट्रक्चरमधील उणिवांमुळे भारत-बांगलादेश सीमेवरील व्यापारात समस्या निर्माण झाल्या आहेत.
