Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘वृद्धीदर १५ वर्षांपर्यंत ८-१० टक्के राहणार’

‘वृद्धीदर १५ वर्षांपर्यंत ८-१० टक्के राहणार’

भारतीय अर्थव्यवस्था येती १५ वर्षे ८ ते १० टक्के वृद्धीदर राखण्याची आशा आहे. तथापि, डॉलरचा विचार केला तर देशी अर्थव्यवस्थेचा विस्तार आणखीही जास्त होऊ शकेल.

By admin | Updated: April 13, 2015 23:36 IST2015-04-13T23:36:31+5:302015-04-13T23:36:31+5:30

भारतीय अर्थव्यवस्था येती १५ वर्षे ८ ते १० टक्के वृद्धीदर राखण्याची आशा आहे. तथापि, डॉलरचा विचार केला तर देशी अर्थव्यवस्थेचा विस्तार आणखीही जास्त होऊ शकेल.

'Growth will be 8-10 percent for 15 years' | ‘वृद्धीदर १५ वर्षांपर्यंत ८-१० टक्के राहणार’

‘वृद्धीदर १५ वर्षांपर्यंत ८-१० टक्के राहणार’

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था येती १५ वर्षे ८ ते १० टक्के वृद्धीदर राखण्याची आशा आहे. तथापि, डॉलरचा विचार केला तर देशी अर्थव्यवस्थेचा विस्तार आणखीही जास्त होऊ शकेल. ही माहिती निति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी दिली. ते सोमवारी येथे ऊर्जा क्षेत्राच्या संमेलनात बोलत होते. पनगढिया म्हणाले, ‘‘मला आशा आहे की येत्या १५ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था ८ ते १० टक्के वृद्धीदर राखेल. हा वृद्धीदर रुपयात ८ ते १० टक्के राहिला तर डॉलरच्या हिशेबात हाच दर ११-१२ टक्के असेल आणि या वृद्धीने भारत ८ हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा बनेल. सध्या तो २ हजार अब्ज डॉलरचा आहे.’’
अर्थ मंत्रालयाने विद्यमान आर्थिक वर्षासाठी ८ ते ८.५ टक्के आणि येत्या वर्षात दोन आकडी वृद्धीचा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था आठ टक्क्यांपर्यंत गेली व ती दीर्घकाळपर्यंत कायम राहिली, असेही पनगढिया म्हणाले. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अंदाजानुसार भारताची आर्थिक वृद्धी २०१४-२०१५ मध्ये ७.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे.









 

Web Title: 'Growth will be 8-10 percent for 15 years'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.