नवी दिल्ली : नवीन व्यावसायिक आॅर्डरमध्ये उल्लेखनीय वाढ झाल्याने भारताच्या सेवा क्षेत्रातील वृद्धी डिसेंबरमध्ये सर्वोच्च स्थानावर पोहोचली; पण बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती नाजूक राहिली, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे.
नवीन आॅर्डरमुळे निवक्रेई व्यावसायिक घडामोडीविषयक सूचकांक डिसेंबरमध्ये १० महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर जाताना ५३,६०८ पोहोचला. नोव्हेंबरमध्ये तो ५०.१ वर होता. डिसेंबरमध्ये खासगी क्षेत्रातील उत्पादनाची वृद्धी साधारणपणे सेवा क्षेत्रापासून प्रेरित राहिला. कारण आॅक्टोबर २०१३ पासून प्रथमच बांधकाम क्षेत्रात घट झाली. हा अहवाल तयार करणाऱ्या मार्केट या संस्थेच्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा म्हणाल्या की, भारताचे खासगी क्षेत्र २०१५ च्या अखेरीस पुन्हा वृद्धीच्या कक्षेत आले आहे.
सेवा क्षेत्रातील वृद्धी डिसेंबरमध्ये वाढली
नवीन व्यावसायिक आॅर्डरमध्ये उल्लेखनीय वाढ झाल्याने भारताच्या सेवा क्षेत्रातील वृद्धी डिसेंबरमध्ये सर्वोच्च स्थानावर पोहोचली
By admin | Updated: January 6, 2016 23:27 IST2016-01-06T23:27:41+5:302016-01-06T23:27:41+5:30
नवीन व्यावसायिक आॅर्डरमध्ये उल्लेखनीय वाढ झाल्याने भारताच्या सेवा क्षेत्रातील वृद्धी डिसेंबरमध्ये सर्वोच्च स्थानावर पोहोचली
