Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेवा क्षेत्रातील वृद्धीदर ३ महिन्यांच्या नीचांकावर

सेवा क्षेत्रातील वृद्धीदर ३ महिन्यांच्या नीचांकावर

फेब्रुवारी महिन्यात भारताची आर्थिक वृद्धी मंदावली आणि नवीन कंत्राटाअभावी सेवा क्षेत्रातील घडामोडी तीन महिन्यांतील नीचांकी स्तरावर आल्याचे निक्केई इंडियाच्या एका सर्वेक्षणात म्हटले आहे

By admin | Updated: March 4, 2016 02:16 IST2016-03-04T02:16:36+5:302016-03-04T02:16:36+5:30

फेब्रुवारी महिन्यात भारताची आर्थिक वृद्धी मंदावली आणि नवीन कंत्राटाअभावी सेवा क्षेत्रातील घडामोडी तीन महिन्यांतील नीचांकी स्तरावर आल्याचे निक्केई इंडियाच्या एका सर्वेक्षणात म्हटले आहे

Growth in service sector at 3-month low | सेवा क्षेत्रातील वृद्धीदर ३ महिन्यांच्या नीचांकावर

सेवा क्षेत्रातील वृद्धीदर ३ महिन्यांच्या नीचांकावर

नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्यात भारताची आर्थिक वृद्धी मंदावली आणि नवीन कंत्राटाअभावी सेवा क्षेत्रातील घडामोडी तीन महिन्यांतील नीचांकी स्तरावर आल्याचे निक्केई इंडियाच्या एका सर्वेक्षणात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक धोरणात्मक व्याजदरात कपात करील, अशी आशा या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात निवकेई सेवा निर्देशांक तीन महिन्यांतील ५१.४ या नीचांकी स्तरावर पोहोचला. जानेवारीत तो ५४.३ वर होता. मूल्य वाढून मागणी घटल्याने असे झाल्याचे हा अहवाल म्हणतो. फेब्रुवारी महिन्यात सेवा कंपन्यांच्या नवीन कंत्राटात वाढ झाली; पण विस्ताराचा दर गेल्या नोव्हेंबरपासून आतापर्यंत सर्वांत कमी राहिला. या काळात कंत्राटे मिळविण्यासाठी कंपन्यांना कठोर स्पर्धा करावी लागली, असे हा अहवाल म्हणतो.
दरम्यान, निक्केई इंडियाचा संमिश्र पीएमआय निर्देशांक फेब्रुवारीत ५१.२ टक्क्यांवर आला. तो गेल्या जानेवारीत गेल्या ११ महिन्यांतील ५३.३ टक्के या सर्वोच्च स्तरावर होता. यात उत्पादन आणि सेवा क्षेत्र या दोन्हींचा समावेश होतो.
या सर्वेक्षणाचे विश्लेषण करणाऱ्या अर्थतज्ज्ञ पॉलियाचा डी म्हणाल्या की, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील मंदीसोबत फेब्रुवारीत आर्थिक वृद्धीही मंदावली. देशातील मागणी कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच नवीन कंत्राटांवर परिणाम होत आहे. रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही, याबाबत त्या म्हणाल्या की, महागाई नियंत्रणात असून, जागतिक परिस्थिती पाहता व्याजदरात कपात करण्यास खूपच वाव आहे.

Web Title: Growth in service sector at 3-month low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.