Lokmat Money > बिझनेस न्यूज > होळीची राख लावण्यावरून कोयत्याचे वार

होळीची राख लावण्यावरून कोयत्याचे वार

ठाणे : होळीची राख लावण्यावरून नितेश सिंग यांच्यावर अक्षय कदमसह तिघांनी कोयत्याने वार केले. त्यांच्याविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिघेही पसार झाले आहेत. तुळशीधामच्या धर्मवीरनगर येथील सृष्टीविहार इमारत क्र. १३ च्या गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला.

By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:26+5:302015-03-06T23:07:26+5:30

ठाणे : होळीची राख लावण्यावरून नितेश सिंग यांच्यावर अक्षय कदमसह तिघांनी कोयत्याने वार केले. त्यांच्याविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिघेही पसार झाले आहेत. तुळशीधामच्या धर्मवीरनगर येथील सृष्टीविहार इमारत क्र. १३ च्या गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला.

Growth of Holi ashes | होळीची राख लावण्यावरून कोयत्याचे वार

होळीची राख लावण्यावरून कोयत्याचे वार

णे : होळीची राख लावण्यावरून नितेश सिंग यांच्यावर अक्षय कदमसह तिघांनी कोयत्याने वार केले. त्यांच्याविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिघेही पसार झाले आहेत. तुळशीधामच्या धर्मवीरनगर येथील सृष्टीविहार इमारत क्र. १३ च्या गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार घडला.
नितेश हे होळीच्या ठिकाणी उभे असताना इमारत क्र. १४ मधील अक्षय यांनी त्यांच्या गालाला होळीची राख लावली. तेव्हा त्यांनीही त्यांच्या गालाला राख लावली. याचाच राग आल्याने अक्षयने त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर प्रकाश कदम आणि बबन या दोघांनीही त्यांना मारहाण केली. प्रकाशने त्यांना पकडून ठेवले आणि अक्षयने त्यांच्या डोक्यावर वार केला. याप्रकरणी त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक बी. जी. भुसारे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Growth of Holi ashes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.