नवी दिल्ली : शेती, वस्तू उत्पादन आणि सेवा क्षेत्राच्या मंद गतीमुळे सकल देशी उत्पादनाचा (जीडीपी) वेग एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये ७ टक्केच राहिला. त्याआधीच्या तिमाहीत तो ७.५ टक्के होता.
औद्योगिक उत्पादनाच्या विस्ताराबरोबर जीडीपीच्या खाली आलेल्या दराला रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केलेल्या कपातीने आधार दिला. आर्थिक उपक्रमांची मोजणी करण्यासाठी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने (सीएओ) नव्याने अवलंबिलेले ग्रॉस व्हॅल्यू अॅडेड (जीव्हीए) हे मानकदेखील पहिल्या तिमाहीमध्ये ७.१ एवढे खाली आले. ते वर्षभरापूर्वी याच कालावधीत ७.४ टक्के होते.
जानेवारी ते मार्च या कालावधीत जीडीपीची वाढ ७.५ टक्के होती व तीच गेल्या वर्षीच्या याच कालावधीत ६.७ टक्के होती, अशी माहिती सीएसओने दिली. सध्याच्या बाजारातील किमतीनुसार नाममात्र जीडीपी व जीव्हीए एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये खाली आल्याचे दिसते. नाममात्र जीडीपी पहिल्या तिमाहीत ८.८ टक्के झाला. तो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीमध्ये १३.४ टक्के होता.
जीव्हीए गेल्यावर्षी १४ टक्के होता, तो यावर्षी पहिल्या तिमाहीत ७.१ टक्क्यांवर आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
वृद्धीदर घसरला!
शेती, वस्तू उत्पादन आणि सेवा क्षेत्राच्या मंद गतीमुळे सकल देशी उत्पादनाचा (जीडीपी) वेग एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये ७ टक्केच राहिला. त्याआधीच्या
By admin | Updated: September 1, 2015 09:06 IST2015-08-31T22:39:07+5:302015-09-01T09:06:03+5:30
शेती, वस्तू उत्पादन आणि सेवा क्षेत्राच्या मंद गतीमुळे सकल देशी उत्पादनाचा (जीडीपी) वेग एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये ७ टक्केच राहिला. त्याआधीच्या
