Lokmat Money > बिझनेस न्यूज > मयत होमगार्डच्या पत्नीस २ लाख १० हजाराचा निधी मंजूर

मयत होमगार्डच्या पत्नीस २ लाख १० हजाराचा निधी मंजूर

उमरी: येथील पोलिस स्टेशनला कर्तव्यावर असलेल्या गणपत बाळू गायकवाड या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अवघ्या दोनच महिन्यात राज्य शासनाने मयत होमगाडरच्या पत्नीस २ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला.

By admin | Updated: February 25, 2015 00:17 IST2015-02-25T00:17:34+5:302015-02-25T00:17:34+5:30

उमरी: येथील पोलिस स्टेशनला कर्तव्यावर असलेल्या गणपत बाळू गायकवाड या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अवघ्या दोनच महिन्यात राज्य शासनाने मयत होमगाडरच्या पत्नीस २ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला.

A grant of 2 lakh and 10 thousand rupees to the wife of the deceased Homeguard | मयत होमगार्डच्या पत्नीस २ लाख १० हजाराचा निधी मंजूर

मयत होमगार्डच्या पत्नीस २ लाख १० हजाराचा निधी मंजूर

री: येथील पोलिस स्टेशनला कर्तव्यावर असलेल्या गणपत बाळू गायकवाड या होमगार्डचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अवघ्या दोनच महिन्यात राज्य शासनाने मयत होमगाडरच्या पत्नीस २ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजूर केला.
गणपत बाळू गायकवाड या होमगार्डचा ६ डिसेंबर २०१४ रोजी ड्युटीवर असताना हृदयविकाराने मृत्यू झाला. पहिल्यांदाच या मयत होमगार्डचा अंत्यविधी शासकीय इतमामात पार पडला. मयत होमगार्डच्या कुटुंबियांना शासनातर्फे त्वरित आर्थिक मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने नांदेडचे अपर पोलिस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक तानाजी चिखले यांनी संबंधितांना सूचना केल्या. कागदपत्राची वेळीच पूर्तता करुन हा प्रस्ताव महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली. होमगार्ड कल्याण निधी व लोकहितैशी फंडातून मयत गणपत गायकवाड यांची पत्नी सुलोचनाबाई यांना २३ फेब्रुवारी रोजी २ लाख १० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. एवढ्या तातडीने होमगार्ड जवानाच्यजा वारसांना शासकीय मदत मिळण्याची पहिलीच वेळ असल्याने पथकातील होमगार्ड गणेश मदने, देवीदास सावळे, शेख चांद, पवार, नितीन कोटूरवार, शंकर व˜मवार, श्याम सवई, संभाजी मागीलवाड, मयत होमगार्डच्या कुटुंबियांनी कृतज्ञता व्यक्त केली. (वार्ताहर)

Web Title: A grant of 2 lakh and 10 thousand rupees to the wife of the deceased Homeguard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.