Lokmat Money > बिझनेस न्यूज > बुलडाण्याच्या ग्रामसेवकाचा औरंगाबादेत आत्महत्येचा प्रयत्न

बुलडाण्याच्या ग्रामसेवकाचा औरंगाबादेत आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद : आजाराला कंटाळून एका ग्रामसेवकाने गुरुवारी सायंकाळी शहरातील सलीम अली सरोवरामध्ये उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. काही तरुण आणि गस्तीवरील पोलिसांनी वेळीच त्याला बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले.

By admin | Updated: July 31, 2015 00:52 IST2015-07-31T00:52:18+5:302015-07-31T00:52:18+5:30

औरंगाबाद : आजाराला कंटाळून एका ग्रामसेवकाने गुरुवारी सायंकाळी शहरातील सलीम अली सरोवरामध्ये उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. काही तरुण आणि गस्तीवरील पोलिसांनी वेळीच त्याला बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले.

Gramsevak of Buldhana attempted suicide in Aurangabad | बुलडाण्याच्या ग्रामसेवकाचा औरंगाबादेत आत्महत्येचा प्रयत्न

बुलडाण्याच्या ग्रामसेवकाचा औरंगाबादेत आत्महत्येचा प्रयत्न

ंगाबाद : आजाराला कंटाळून एका ग्रामसेवकाने गुरुवारी सायंकाळी शहरातील सलीम अली सरोवरामध्ये उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. काही तरुण आणि गस्तीवरील पोलिसांनी वेळीच त्याला बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले.
प्रतापसिंग सुरडकर (५२ , रा. बोहडा, ता. चिखली, जि. बुलडाणा) असे या ग्रामसेवकाचे नाव आहे. एका व्यक्तीने सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सलीम अली सरोवरात उडी घेतल्याचे एका तरुणाने पाहिले. त्याने लगेचच गस्तीवरील सिटीचौक पोलीस आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पाण्यात उड्या मारून त्यास बाहेर काढले.
त्यानंतर त्याला सिटीचौक ठाण्यात आणण्यात आले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव आणि पत्ता सांगितला. तीन दिवसांपूर्वी उपचाराकरिता औरंगाबादेत जातो, असे सांगून घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला नसल्याने त्यांची पत्नी सुमन, नातेवाईक सुनील सुरडकर, प्र्रल्हाद राजपूत हे गुरुवारी सकाळी औरंगाबादेत आले. त्यांनी विविध रुग्णालयांत त्यांचा शोध सुरू केला होता. त्याचवेळी पोलिसांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याने ते पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता प्रतापसिंग यांचे मानसिक स्वास्थ्य एक महिन्यापासून बिघडल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Gramsevak of Buldhana attempted suicide in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.