पाणीपुरवठा विभाग कार्यशाळा
नाशिक : ग्रामपंचायत स्तरावरून ग्रामस्थांना शुद्ध व स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी असल्याने नियमित पाण्याचे शुद्धिकरण होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी केले.
पाणीपुरवठा विभाग व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात पावसाळ्यानंतरचे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोेतांची रासायनिक तपासणी व स्वच्छता सर्वेक्षण या विषयावर आधारित एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यात बनकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, पाण्यात नियमित ठरलेल्या प्रमाणात टीसीएल पावडर टाकली जाते की नाही, ओ.टी. चाचणी घेतली जाते का याची जबाबदारीने पडताळणी करणे हे ग्रामसेवक व आरोग्यसेवक यांचे महत्त्वाचे काम असून, गटविकास अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी त्यात लक्ष घालणे जरुरीचे असल्याचे सुखदेव बनकर यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. विजय डेकाटे, सुरेश जाधव, भाग्यश्री बैरागी, रवींद्र बराथे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शुद्ध पाणीपुरवठ्याची जबाबदारी ग्रामपंचायतींची : बनकर
पाणीपुरवठा विभाग कार्यशाळा
By admin | Updated: September 23, 2014 00:13 IST2014-09-22T22:44:09+5:302014-09-23T00:13:54+5:30
पाणीपुरवठा विभाग कार्यशाळा
