Lokmat Money > बिझनेस न्यूज > ग्रामपंचायत गावठाण क्षेत्रात देणार बांधकामास मंजुरी

ग्रामपंचायत गावठाण क्षेत्रात देणार बांधकामास मंजुरी

ग्रामीण क्षेत्राच्या नियोजित विकासाला गती देण्यासाठी विधानसभेने ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामपंचायतीला आणि त्याच्या बाहेरच्या क्षेत्रात तहसीलदाराच्या मंजुरीनेच बांधकाम करण्या

By admin | Updated: December 20, 2014 08:36 IST2014-12-19T23:19:47+5:302014-12-20T08:36:29+5:30

ग्रामीण क्षेत्राच्या नियोजित विकासाला गती देण्यासाठी विधानसभेने ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामपंचायतीला आणि त्याच्या बाहेरच्या क्षेत्रात तहसीलदाराच्या मंजुरीनेच बांधकाम करण्या

Gram Panchayat approval for the construction of the Gaothan area | ग्रामपंचायत गावठाण क्षेत्रात देणार बांधकामास मंजुरी

ग्रामपंचायत गावठाण क्षेत्रात देणार बांधकामास मंजुरी


विधी १९- ग्रामपंचायत गावठाण क्षेत्रात देणार बांधकामास मंजुरी
गावठाण बाहेरची जबाबदारी तहसीलदारावर : विधानसभेत संशोधन विधेयक मंजूर
नागपूर : ग्रामीण क्षेत्राच्या नियोजित विकासाला गती देण्यासाठी विधानसभेने ग्रामपंचायत क्षेत्रात ग्रामपंचायतीला आणि त्याच्या बाहेरच्या क्षेत्रात तहसीलदाराच्या मंजुरीनेच बांधकाम करण्यासंदर्भातील संशोधन विधेयकाला आज मंजुरी प्रदान केली. हा निर्णय ज्या गावातील प्रादेशिक योजना मंजूर करण्यात आली आहे, त्या गावालासुद्धा लागू राहील.
विधानसभेमध्ये शुक्रवारी यासंबंधातील महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मध्ये संशोधन करणारे विधेयक पारित करण्यात आले. नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधेयक पारित करण्याची विनंती करताना सभागृहाला सांगितले की, प्रादेशिक योजना मंजूर झाल्यानंतरही ग्राम पंचायत आणि त्याच्या परिसरातील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकाम होत आहे. ते थांबविण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. सध्या महानगरपालिका आणि नगरपालिकांसोबतच जिल्हा परिषदांनाच बांधकामास मंजुरी प्रदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे. आता राज्य सरकारने या संशोधन विधेयकाच्या माध्यमातून ग्राम पंचायत आणि तहसीलदारांनाही ते अधिकार प्रदान करण्यात येणार आहे.


मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनणार
विरोधी पक्षातर्फे जयंत पाटील, भास्कर जाधव आणि सत्तापक्षातर्फे आशीष शेलार यांनी या विधेयकावर आपले विचार व्यक्त केले. अवैध बांधकामाबाबत राज्य सरकारने या विधेयकात कुठलेही नियोजन केलेले नसल्याने विधेयकाबाबत शंका उपस्थित केली. सदस्यांनी सुचविलेल्या सूचनांसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवून सदस्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले.

दादर रेल्वे स्टेशनला डॉ. आंबेडकरांचे नाव द्या

नागपूर :
दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे सदस्य राम कदम यांनी शुक्रवारी औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला लाखो लोक दरवर्षी येतात. त्या पार्श्वभूमीवर दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. 

Web Title: Gram Panchayat approval for the construction of the Gaothan area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.