राज्यपालांचा आज शपथविधी
By admin | Updated: August 29, 2014 23:33 IST2014-08-29T23:33:17+5:302014-08-29T23:33:17+5:30

राज्यपालांचा आज शपथविधी
>मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सी. विद्यासागर राव यांचा शनिवारी दुपारी ४ वाजता राजभवनावर शपथविधी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा त्यांना राज्यपालपदाची शपथ देतील. के. शंकरनारायणन यांनी २४ ऑगस्टला राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली, महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. (विशेष प्रतिनिधी)