Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारच्या ‘सोने कर्ज’ योजनेची सुरुवात मे महिन्यापासून होणार

सरकारच्या ‘सोने कर्ज’ योजनेची सुरुवात मे महिन्यापासून होणार

देशातील सोन्याच्या व्यवहारांना चाप लावतानाच ग्राहकांच्या घरात पडून असलेल्या सोन्यावर त्यांना काही परतावा देण्याच्या दृष्टीने

By admin | Updated: March 10, 2015 23:56 IST2015-03-10T23:56:37+5:302015-03-10T23:56:37+5:30

देशातील सोन्याच्या व्यवहारांना चाप लावतानाच ग्राहकांच्या घरात पडून असलेल्या सोन्यावर त्यांना काही परतावा देण्याच्या दृष्टीने

The government's 'gold loan' scheme will start from May | सरकारच्या ‘सोने कर्ज’ योजनेची सुरुवात मे महिन्यापासून होणार

सरकारच्या ‘सोने कर्ज’ योजनेची सुरुवात मे महिन्यापासून होणार

मुंबई : देशातील सोन्याच्या व्यवहारांना चाप लावतानाच ग्राहकांच्या घरात पडून असलेल्या सोन्यावर त्यांना काही परतावा देण्याच्या दृष्टीने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सूतोवाच केलेली ‘सोने कर्ज’ योजना येत्या मे महिन्यापासून सुरू करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे, ग्राहकांना त्यांच्या घरात अथवा लॉकरमध्ये पडून असलेले सोने बँकेच्या योजनेत सहभागी होत जमा करता येईल. सोन्याच्या मूल्याच्या प्रमाणात त्यांना त्यावर मासिक अथवा वार्षिक पद्धतीने व्याज दिले जाईल. या योजनेचीनियमावली अद्याप जाहीर केलेली नाही. परंतु, ज्या धर्तीवर ग्राहकांकडून सोने डिपॉझिट केले जाईल, त्याचधर्तीवर ज्वेलरी उद्योगाला सोन्याची विक्री अथवा सोन्याच्या मूल्याच्या रकमेचे सोने कर्ज म्हणून दिले जाईल.
दरम्यान, देशातील सोन्याची मागणी लक्षात घेता आणि त्याचा सरकारी तिजोरीवर पडणारा बोजा लक्षात घेता सरकारने आयात शुल्कात कपात केली नाही. मात्र, मागणीचा वाढता रेटा लक्षात घेत त्यावर तोडगा म्हणून ही योजना सादर केली आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: The government's 'gold loan' scheme will start from May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.