नवी दिल्ली : केंद्र सरकार भारतीय टपाल बँकेच्या स्थापनेला अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने पुढच्या महिन्यात संसदेत विधेयक आणण्याच्या तयारीत आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेशी लवकरच संपर्क साधून बँक परवान्यासाठी टपाल विभागाने केलेल्या अर्जावर तातडीने विचार करण्याची विनंती करण्यात यईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक समग्र बँकेच्या रूपात बँकिंग क्षेत्रात पदार्पण करण्याची आपली तयारी असल्याचे टपाल विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत सांगितले होते. पंतप्रधानांना सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, टपाल विभाग केंद्र सरकारसोबत विचारविमर्श करून याच महिन्यात रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधू शकते. समग्र बँकेसाठी केलेल्या आपल्या अर्जावर रिझर्व्ह बँकेने विचार करावा, यासाठी टपाल विभागाचा हा प्रयत्न असेल. त्यासोबतच टपाल बँक स्थापन करण्यासाठी सरकारकडून एक विधेयक आणण्याचाही प्रयत्न केला जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
टपाल बँक सुरू करण्यासाठी सरकार विधेयक आणणार
केंद्र सरकार भारतीय टपाल बँकेच्या स्थापनेला अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने पुढच्या महिन्यात संसदेत विधेयक आणण्याच्या तयारीत आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेशी लवकरच संपर्क
By admin | Updated: January 12, 2015 01:54 IST2015-01-12T01:54:20+5:302015-01-12T01:54:20+5:30
केंद्र सरकार भारतीय टपाल बँकेच्या स्थापनेला अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने पुढच्या महिन्यात संसदेत विधेयक आणण्याच्या तयारीत आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेशी लवकरच संपर्क
