Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारी कंपन्या तेल शुद्धीकरणाची क्षमता 37 टक्क्यांनी वाढविणार

सरकारी कंपन्या तेल शुद्धीकरणाची क्षमता 37 टक्क्यांनी वाढविणार

सार्वजनिक क्षेत्रतील तेल रिफायनरी कंपन्या 2016-17 सालार्पयत तेल शुद्धीकरणाची आपली क्षमता 37 टक्क्यांनी वाढवून 18.53 कोटी टन करणार आहेत.

By admin | Updated: July 25, 2014 23:24 IST2014-07-25T23:24:37+5:302014-07-25T23:24:37+5:30

सार्वजनिक क्षेत्रतील तेल रिफायनरी कंपन्या 2016-17 सालार्पयत तेल शुद्धीकरणाची आपली क्षमता 37 टक्क्यांनी वाढवून 18.53 कोटी टन करणार आहेत.

Government companies will increase the oil refining capacity by 37 percent | सरकारी कंपन्या तेल शुद्धीकरणाची क्षमता 37 टक्क्यांनी वाढविणार

सरकारी कंपन्या तेल शुद्धीकरणाची क्षमता 37 टक्क्यांनी वाढविणार

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रतील तेल रिफायनरी कंपन्या 2016-17 सालार्पयत तेल शुद्धीकरणाची आपली क्षमता 37 टक्क्यांनी वाढवून 18.53 कोटी टन करणार आहेत. आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल या कंपन्यांचा त्यामध्ये समावेश आहे.
याच कालावधीत पारादीप येथे एक नवीन तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची योजना आहे. सरकारी तेल शुद्धीकरण कंपन्या सध्या 19 तेल शुद्धीकरण कारखाने चालवितात. त्यांची एकूण क्षमता 13.506 कोटी टन इतकी आहे. यात सर्वाधिक 5.42 टन तेल शुद्धीकरण क्षमता आयओसीची आहे. आयओसीकडे चेन्नई पेट्रोलियमचे (सीपीसीएल) नियंत्रणही आहे. सीपीसीएलची तेल शुद्धीकरण क्षमता 1.15 कोटी टन आहे. केंद्र सरकारच्या वतीने अलीकडेच  लोकसभेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, पारादीप तेल शुद्धीकरण प्रकल्प आयओसीचाच आहे. हा प्रकल्प यंदाच चालू होऊ शकतो. याची एकूण शुद्धीकरण क्षमता 1.5 कोटी टनांची आहे. 
 आयओसीचा पारादीप प्रकल्प याक्षणी अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचे 96.7 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च 29,777 कोटी रुपये आहे. तेल मंत्रलयाशी संबंधित सूत्रंनी सांगितले की, भारत झपाटय़ाने विकास करीत आहे. त्यामुळे तेलाची गरज दिवसागणिक वाढत आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी तेलशुद्धीकरण प्रकल्पांत वाढ करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने सरकार पावले उचलित आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Government companies will increase the oil refining capacity by 37 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.