Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘सरकारी बँकांना आणखी भांडवल मिळायला हवे’

‘सरकारी बँकांना आणखी भांडवल मिळायला हवे’

पुढील सप्ताहात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारी बँकांना आणखी भांडवल देण्याची गरज आहे; अन्यथा या बँकांना रेटिंगच्या दबावाचा सामना करावा लागेल. मुडीज इन्व्हेस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2016 03:17 IST2016-02-25T03:17:28+5:302016-02-25T03:17:28+5:30

पुढील सप्ताहात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारी बँकांना आणखी भांडवल देण्याची गरज आहे; अन्यथा या बँकांना रेटिंगच्या दबावाचा सामना करावा लागेल. मुडीज इन्व्हेस्टर

Government Banks Should Get More Capital | ‘सरकारी बँकांना आणखी भांडवल मिळायला हवे’

‘सरकारी बँकांना आणखी भांडवल मिळायला हवे’

नवी दिल्ली : पुढील सप्ताहात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारी बँकांना आणखी भांडवल देण्याची गरज आहे; अन्यथा या बँकांना रेटिंगच्या दबावाचा सामना करावा लागेल. मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेसने आज हा इशारा जारी केला.
सार्वजनिक क्षेत्रांतील बँका एनपीएलच्या (नॉन परफॉर्मिंग लोन) समस्येचा सामना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मूडीजने हा इशारा दिला आहे. मुडीजचे उपाध्यक्ष तथा वरिष्ठ के्रडिट अधिकारी श्रीकांत वाडलामणी यांनी सांगितले की, सरकारी बँकांच्या एनपीएलमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे या बँकांना भांडवलाची समस्या भेडसावत आहे. त्यांना अर्थसंकल्पातून अर्थपुरवठा करणे आवश्यक आहे.
भांडवल दिले गेले नाही, तर त्यांना आपल्या क्रेडिट प्रोफाईलबाबत नकारात्मक दबाव सहन करावा लागेल. मुडीज ही संस्था भारतातील ११ सरकारी बँकांचे रेटिंग करते. मुडीजच्या म्हणण्यानुसार, ३१ मार्च २0१९ पर्यंत या बँकांना १.४५ लाख कोटी रुपयांच्या बाह्य भांडवलाची गरज आहे.

 

Web Title: Government Banks Should Get More Capital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.