Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुगलची नवी आॅपरेटिंग सिस्टीम ब्रिलो

गुगलची नवी आॅपरेटिंग सिस्टीम ब्रिलो

तंत्रज्ञानामध्ये सातत्याने नेहमी नवीन काहीतरी देण्यासाठी सदैव आघाडीवर असलेल्या गुगलने याही वेळी एक धमाका केला आहे. गुगलने एक नवीन आॅपरेटिंग सिस्टीम बाजारात

By admin | Updated: June 2, 2015 23:59 IST2015-06-02T23:59:18+5:302015-06-02T23:59:18+5:30

तंत्रज्ञानामध्ये सातत्याने नेहमी नवीन काहीतरी देण्यासाठी सदैव आघाडीवर असलेल्या गुगलने याही वेळी एक धमाका केला आहे. गुगलने एक नवीन आॅपरेटिंग सिस्टीम बाजारात

Google's new operating system Brillo | गुगलची नवी आॅपरेटिंग सिस्टीम ब्रिलो

गुगलची नवी आॅपरेटिंग सिस्टीम ब्रिलो

अनिल भापकर, औरंगाबाद
तंत्रज्ञानामध्ये सातत्याने नेहमी नवीन काहीतरी देण्यासाठी सदैव आघाडीवर असलेल्या गुगलने याही वेळी एक धमाका केला आहे. गुगलने एक नवीन आॅपरेटिंग सिस्टीम बाजारात आणण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आॅपरेटिंग सिस्टीमचे नाव आहे ब्रिलो.
वेगवेगळे डिव्हाईस स्मार्टफोनशी कनेक्ट करण्यासाठी या ब्रिलो आॅपरेटिंग सिस्टीमचा उपयोग होणार आहे. सध्या होम अप्लायन्समधील येऊ घातलेल्या क्रांतीमध्ये म्हणजेच इंटरनेट आॅफ थिंग्स या तंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने ब्रिलो या आॅपरेटिंग सिस्टीमचा वापर होणार आहे.
येणारा काळ हा होम अप्लायन्समध्ये क्रांती घडवणारा काळ असेल. त्याला कारणही तसेच आहे. कारण येणाऱ्या काळात तुमच्या घरातील वॉशिंग मशीन, टीव्ही, रेफ्रिजरेटर,कॉफीमेकर मशीन, तुमच्या घराचा दरवाजा तसेच घरातील सीसीटीव्ही कॅमेरे अगदी सर्व काही इंटरनेटवर काम करणार आहे. म्हणजेच हे सर्व होम अप्लायन्स इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरून कंट्रोल करता येणार आहे, जसे क ीबंद करणे, चालू करणे, तुमच्या घरातील कॉफीमेकरला तुमच्यासाठी कॉफी करायला सांगणे (आॅनलाईन तुमच्या स्मार्टफोनवरून), तुमच्या घरातील लाईट बंद करणे, चालू करणे आदी. म्हणजेच तुमच्या घरातील सर्व डिव्हाईसला तुम्ही तुमच्या बोटावर नाचवू शकता. अर्थात तुमची प्रत्येक आज्ञा हे होम अप्लायन्स न कुरकुरता पाळत जाईल. याच तंत्रज्ञानाला इंटरनेट आॅफ थिंग्स असे म्हणतात. याच इंटरनेट आॅफ थिंग्ससाठी गुगलच्या ब्रिलो या आॅपरेटिंग सिस्टीमचा वापर होईल.

Web Title: Google's new operating system Brillo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.