Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुगल सर्चने बाजारातील घसरणीचा कल घेणे शक्य

गुगल सर्चने बाजारातील घसरणीचा कल घेणे शक्य

दिवसेंदिवस मानवी जीवनावरील तंत्रज्ञानाचे आक्रमण वाढत आहे. आता गुगल सर्चने शेअर बाजारातील घसरणीचा कल घेणे शक्य असल्याचा दावा एका ताज्या संशोधनात करण्यात आला आहे

By admin | Updated: July 31, 2014 03:27 IST2014-07-31T03:27:26+5:302014-07-31T03:27:26+5:30

दिवसेंदिवस मानवी जीवनावरील तंत्रज्ञानाचे आक्रमण वाढत आहे. आता गुगल सर्चने शेअर बाजारातील घसरणीचा कल घेणे शक्य असल्याचा दावा एका ताज्या संशोधनात करण्यात आला आहे

Google search can lead to market downward trend | गुगल सर्चने बाजारातील घसरणीचा कल घेणे शक्य

गुगल सर्चने बाजारातील घसरणीचा कल घेणे शक्य

लंडन : दिवसेंदिवस मानवी जीवनावरील तंत्रज्ञानाचे आक्रमण वाढत आहे. आता गुगल सर्चने शेअर बाजारातील घसरणीचा कल घेणे शक्य असल्याचा दावा एका ताज्या संशोधनात करण्यात आला आहे. ब्रिटनमधील वारविक बिझनेस स्कूल आणि अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाच्या एका अभ्यास गटाने हा निष्कर्ष काढला.
शेअर बाजारातील घसरणीपूर्वी गुगलवर शोधली जाणारी माहिती स्वयंचलित पद्धतीने चिन्हित करण्याची एक यंत्रणा या अभ्यासगटाने विकसित केली आहे. यानुसार २००४ ते २०१२ या काळातील आकडेवारीच्या विश्लेषणावरून व्यापार आणि राजकीय विषयांबाबत शोध सुरू झाल्यानंतर शेअर बाजार निश्चितपणे कोसळतो. अशा प्रकारचा सर्च डेटा अर्थात शोधमाहिती बाजारातील संभाव्य घसरणीसाठीचा इशारा संकेत म्हणून वापरली जाऊ शकते, अशी शिफारस या अभ्यासगटाने केली आहे. शेअर बाजारातील संभाव्य घसरणीपूर्वी ग्राहक इंटरनेटवर कशाची माहिती गोळा करतात याचे विश्लेषण या अभ्यासगटाने केले. यासाठी गुगल आणि विकिपीडिया यांच्याकडून याबाबतची माहिती मिळविण्यात आली. तथापि, आर्थिक घडामोडींशी संबंधित ‘कीवर्ड’चा यासाठी वापर करण्यात आला. स्वयंचलित यंत्रणेद्वारे मिळालेल्या माहितीचे या गटाने अल्गोरिदमच्या मदतीने विश्लेषण केले. यात व्यापारविश्वाशी संबंधित बिझनेस, मॅनेजमेंट आणि बँक या अर्थविषयक शब्दांचा यात अभ्यास करण्यात आला.
२००४ ते २०१२ या काळात अमेरिकेतील इंटरनेट ग्राहकांकडून या अभ्यासगटाने प्रत्येक आठवड्यात शोधण्यात आलेली माहिती गुगल ट्रेंडस्द्वारे मिळविली. राजकारण आणि अर्थकारणाशी संबंधित सर्चमध्ये वाढ किंवा घट झाल्यास याचा शेअर बाजारावर थेट परिणाम होत असल्याचे या अभ्यासात दिसून आले. नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्सने हे संशोधन प्रकाशित केले आहे.
गुगलसारख्या सर्च इंजिनद्वारे ग्राहकांनी दिलेल्या सर्चची सर्व माहिती आपल्या यंत्रणेद्वारे साठवून ठेवली जाते. याद्वारे वास्तविक जगात निर्णय घेण्यापूर्वी लोक कशाबाबत सर्च करत आहेत याची माहिती मिळू शकते. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Google search can lead to market downward trend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.