मंगळूर : इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना जीएसटीमुळे अच्छे दिन येणार आहेत. जीएसटीमुळे त्यांच्या करामध्ये कपात झाल्यामुळे या क्षेत्रातील उत्पादन खर्च कमी होणार असून, त्यातून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमतीही कमी होतील, असे असोचेम-एनईसी यांच्या संयुक्त अभ्यासात म्हटले आहे.
‘इलेक्ट्रिकल्स अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इन इण्डिया’ नावाचा अहवाल जारी करण्यात आला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. स्थानिक उत्पादक कर सवलत ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतील. त्यामुळे या उत्पादनांच्या किमती कमी होतील, असे अहवालात म्हटले आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे विविध प्रकारचे कर संपणार आहेत. या करांचे परिणामही संपतील. त्यातून या क्षेत्राला ऊर्जितावस्था प्राप्त होईल. या लाभाशिवाय साठवणुकीच्या खर्चातही कंपन्यांना ५ ते ८ टक्के रक्कम वाचविता येऊ शकेल, असेही अहवालात म्हटले आहे.
दोन्ही संस्थांनी केलेल्या अभ्यासातील निष्कर्षांनुसार, जीएसटीमुळे या क्षेत्रातील कर कमी झाला आहे. कररचना साधी सरळ झाली आहे. शिवाय करव्यवस्था तंत्रज्ञान समर्थित झाले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी देशात आदर्श वातावरण तयार होईल. सध्याच्या प्रतिकूल वातावरणात संपूर्ण सुधारणा होईल. जीएसटीमुळे इलेक्ट्रॉनिक उद्योगाला मोठे प्रोत्साहन मिळणार असून, त्यातून स्थानिक उत्पादकांच्या मागणीत वाढ होईल. वेअर हाऊसिंग आणि लॉजिस्टिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादकांना मोठी खर्च कपात करणे शक्य होणार आहे. त्याचा थेट फायदा कंपन्यांना होईल. (वृत्तसंस्था)
नोटाबंदीचाही झाला लाभ
अहवालात म्हटले आहे की, सरकारने केलेल्या नोटाबंदीचाही इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला लाभच झाला आहे. नोटाबंदीमुळे आॅनलाइन व्यवहारांत जवळपास दुप्पट वाढ झाली. त्यातून इलेक्ट्रॉनिक पेमेंट उपकरणांची मागणी प्रचंड वाढली. त्यामुळे ही उपकरणे बनविणाऱ्या उत्पादकांना वरदानच मिळाले. इलेक्ट्रॉनिक पेमेंट उद्योगाला आणखीही चालना मिळणार आहे. पॉइंट आॅफ सेल (पीओएस) आणि मोबाइल पॉइंट आॅफ सेल (एमपीओएस) यांची संख्या येत्या काळात सातत्याने वाढत राहील. ही उपकरणे बनविणाऱ्या उत्पादकांसाठी ही चांगली बाब आहे.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सुटे भाग बनवणाऱ्यांना येणार अच्छे दिन
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना जीएसटीमुळे अच्छे दिन येणार आहेत. जीएसटीमुळे त्यांच्या करामध्ये
By admin | Updated: July 7, 2017 01:05 IST2017-07-07T01:05:05+5:302017-07-07T01:05:05+5:30
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना जीएसटीमुळे अच्छे दिन येणार आहेत. जीएसटीमुळे त्यांच्या करामध्ये
