नवी दिल्ली : भारत सरकारने अलीकडेच जारी केलेल्या सुवर्णरोख्यांच्या दोन योजनांपैकी ‘सार्वभौम’ सुवर्णरोखे योजना अधिक यशस्वी ठरण्याची शक्यता असल्याचे ‘नोम्युरा’च्या एका अहवालात म्हटले आहे.
‘नोम्युरा’ ही एक जपानी फर्म आहे. नोम्युराने म्हटले आहे की, ज्यांनी गुंतवणूक क्षेत्रात सोन्याची खरेदी केली आहे, त्यांना त्यातूनही अधिक लाभ मिळविण्यासाठी ‘सार्वभौम’ सुवर्णरोख्यांची योजना अधिक आकर्षक वाटणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यास भारताची सोन्याची आयातही कमालीची घटेल.
भारतात दरवर्षी अंदाजे ३०० मेट्रिक टन सोन्यात गुंतवणूक होते. २०१४-१५ चा विचार करता भारताच्या ‘सुवर्ण आयात बिला’च्या ही ३५ टक्के गुंतवणूक आहे. त्यामुळेच या सार्वभौम सुवर्णरोख्यांच्या योजनेमुळे ‘सुवर्ण आयात बिलात’ कपात होईल, असे ‘नोम्युरा’च्या अहवालात म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत (आॅक्टोबर ते मार्च) सरकार १५ हजार कोटी रुपयांचे ‘सार्वभौम सुवर्णरोखे’ बाजारात आणू इच्छिते. योजना सफल झाल्यास सरकारची वित्तीय तूट घटून सरकारची उसनवारी कमी होईल, असे ‘नोम्युरा’चे म्हणणे आहे.
भारत सरकारने सुवर्णरोख्यांच्या या योजना जाहीर केल्या असल्या तरीही सोने बाळगणाऱ्या खाजगी व्यक्ती आणि मंदिरे यांनी त्यात सहभागी होणे एक आव्हानच असेल.
विशेष म्हणजे अशा प्रकारच्या योजनांपासून मंदिरांची विश्वस्त मंडळे दूरच राहिली. या योजनेत जमा करण्यात आलेले सोने वितळवून त्याच्या चिपा आणि नाणी केली जाणार आहेत.
त्यामुळे खाजगी व्यक्ती या योजनेकडे आकर्षित होतील की नाही, कदाचित त्यावर कर लागण्याची भीती या योजनेत सहभागी होणाऱ्यांना वाटेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सुवर्णरोख्यांची योजना यशस्वी होणार
भारत सरकारने अलीकडेच जारी केलेल्या सुवर्णरोख्यांच्या दोन योजनांपैकी ‘सार्वभौम’ सुवर्णरोखे योजना अधिक यशस्वी ठरण्याची शक्यता असल्याचे ‘नोम्युरा’च्या एका अहवालात म्हटले आहे.
By admin | Updated: September 12, 2015 03:27 IST2015-09-12T03:27:12+5:302015-09-12T03:27:12+5:30
भारत सरकारने अलीकडेच जारी केलेल्या सुवर्णरोख्यांच्या दोन योजनांपैकी ‘सार्वभौम’ सुवर्णरोखे योजना अधिक यशस्वी ठरण्याची शक्यता असल्याचे ‘नोम्युरा’च्या एका अहवालात म्हटले आहे.
