मुंबई : सोन्याचा भाव आगामी एका महिन्यात घटून २३ हजार रुपये तोळ्यावर येईल, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता आणखी बळकट झाली आहे, तसेच अमेरिकेचा डॉलरही मजबूत होत आहे. याचा परिणाम म्हणून सोने आणखी घसरणार आहे, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
एंजल ब्रोकिंगचे सहायक संचालक नवीन माथुर यांनी सांगितले की, डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याची किंमत २३,५00 ते २४,000 रुपये प्रति १0 ग्रॅमवर राहील. जागतिक बाजारात १,0५0 डॉलर प्रति औंसपर्यंत सोने उतरेल. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी सांगितले की, गेल्या सप्ताहात आंतरराष्ट्रीत बाजारात सोने प्रति औंस १,१४0 डॉलरवरून १,0८५ डॉलरवर घसरले आहे. भारतात नऊ महिन्यांपूर्वी सोने ३४ हजार रुपयांवर होते. नऊ महिन्यांच्या काळात सोन्याची किंमत २७ टक्क्यांनी घसरून २४,७00 रुपये तोळ्यावर आली आहे. सध्या चीन आर्थिक संकटात आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी चीन आपले सोन्याचे साठे विकत आहे.
एका महिन्यात सोने २३ हजारांवर येणार
सोन्याचा भाव आगामी एका महिन्यात घटून २३ हजार रुपये तोळ्यावर येईल, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे
By admin | Updated: July 26, 2015 23:04 IST2015-07-26T23:04:11+5:302015-07-26T23:04:11+5:30
सोन्याचा भाव आगामी एका महिन्यात घटून २३ हजार रुपये तोळ्यावर येईल, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे
