Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने आणखी स्वस्त होणार

सोने आणखी स्वस्त होणार

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची बिकट अवस्था कायम राहिल्यास डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव आणखी कमी होऊन २४,५०० रुपये प्रति दहा ग्रॅम होईल. बाजार जाणकारांनी हा अंदाज जाहीर केला आहे.

By admin | Updated: November 3, 2014 03:16 IST2014-11-03T03:16:21+5:302014-11-03T03:16:21+5:30

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची बिकट अवस्था कायम राहिल्यास डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव आणखी कमी होऊन २४,५०० रुपये प्रति दहा ग्रॅम होईल. बाजार जाणकारांनी हा अंदाज जाहीर केला आहे.

Gold will be more affordable | सोने आणखी स्वस्त होणार

सोने आणखी स्वस्त होणार

मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची बिकट अवस्था कायम राहिल्यास डिसेंबरपर्यंत सोन्याचा भाव आणखी कमी होऊन २४,५०० रुपये प्रति दहा ग्रॅम होईल. बाजार जाणकारांनी हा अंदाज जाहीर केला आहे.
मोतीलाल ओसवालचे सहायक उपाध्यक्ष किशोर नार्ने यांनी सांगितले की, रुपया सध्याच्याच पातळीवर कायम राहिल्यास, सोन्याचा भाव डिसेंबरपर्यंत २४,५०० रुपयांवर येईल. एक-दोन आठवड्यांत सोन्याला पुन्हा नवी झळाळी मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. यानंतर डिसेंबर मध्य किंवा अखेरीस सोन्याचा भाव कोसळण्याची शक्यता आहे.
एमसीएक्समध्ये शनिवारी सोन्याचा भाव २६,१४३ रुपये प्रति दहा ग्रॅम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात या मौल्यवान धातूचा भाव १,१७३.३० डॉलर प्रतिऔंस होता. चालू वर्षअखेरीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १,०८० ते १,१२० डॉलर होईल. कॉमट्रेड्झ रिसर्चचे संचालक ज्ञानशेखर त्यागराजन यांनीही या शक्यतेला दुजोरा दिला. ते म्हणाले, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सध्या ६१ रुपयांवर आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास सोन्याचा भाव २५,००० ते २५,५०० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर राहिल. (प्रतिनिधी)

Web Title: Gold will be more affordable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.