Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३0 हजारांच्या उंबरठ्यावर सोने

३0 हजारांच्या उंबरठ्यावर सोने

परदेशात असलेली मागणी आणि स्थानिक सराफांनी चालविलेले खरेदीसत्र यामुळे सोने ८५० रुपयांनी वधारून २९,६५० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. त्याचप्रमाणे चांदीही ७५० रुपयांनी

By admin | Updated: February 13, 2016 03:41 IST2016-02-13T03:41:28+5:302016-02-13T03:41:28+5:30

परदेशात असलेली मागणी आणि स्थानिक सराफांनी चालविलेले खरेदीसत्र यामुळे सोने ८५० रुपयांनी वधारून २९,६५० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. त्याचप्रमाणे चांदीही ७५० रुपयांनी

Gold at the threshold of 30 thousand | ३0 हजारांच्या उंबरठ्यावर सोने

३0 हजारांच्या उंबरठ्यावर सोने

नवी दिल्ली : परदेशात असलेली मागणी आणि स्थानिक सराफांनी चालविलेले खरेदीसत्र यामुळे सोने ८५० रुपयांनी वधारून २९,६५० रुपये प्रति १० ग्रॅम झाले. त्याचप्रमाणे चांदीही ७५० रुपयांनी वधारून ३७,८५० रुपये प्रति किलो झाली.
गेल्या ११ व्यावसायिक सत्रांपासून सोन्याची भाववाढ होत आहे. सोन्याचे भाव सतत वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या ११ सत्रांत सोने २,६०० रुपयांनी महागले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरत चालले आहे. त्यामुळे सोन्याची आयात महागली. लग्नसराईमुळे सराफांकडून मागणी वाढल्याने सोन्याचे भाव वाढत आहेत. त्यामुळेच सोन्याचे भाव आज ३० हजारांच्या जवळ पोहोचले. कारखानदार आणि नाणे उत्पादक यांच्याकडून खरेदी वाढल्याने चांदीही वधारली. चांदीच्या १०० नाण्यांच्या विक्रीचा भाव एक हजार रुपयांनी वाढून ५५,००० रुपये, तर खरेदीचा दर ५४,००० रुपये
झाला. २०१५ या वर्षात सोन्याची मागणी ८४८.९ टनावर स्थिर राहिली.

जागतिक बाजारात न्यूयॉर्क येथे सोन्याचा भाव ४.१४ टक्क्यांनी वाढून १२४६.४३ अमेरिकी डॉलर प्रति औंस झाला. चांदीचा भावही ३.१४ टक्क्यांनी वाढून १५.७६ अमेरिकी डॉलर प्रति औंस इतका झाला.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचा भाव ८५० रुपयांनी वाढून अनुक्रमे २९,६५० आणि २९,५०० रुपये झाला. यापूर्वी १६ मे २०१४ रोजी हा भाव होता.

Web Title: Gold at the threshold of 30 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.