Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने स्थिर, चांदी घसरली

सोने स्थिर, चांदी घसरली

परेदशात सोन्याला मजबुती मिळूनही बुधवारी स्थानिक दागिने विक्रेत्यांनी किरकोळ खरेदी केल्याने दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर २५,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिर राहिले.

By admin | Updated: December 31, 2015 02:51 IST2015-12-31T02:51:15+5:302015-12-31T02:51:15+5:30

परेदशात सोन्याला मजबुती मिळूनही बुधवारी स्थानिक दागिने विक्रेत्यांनी किरकोळ खरेदी केल्याने दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर २५,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिर राहिले.

Gold stabilizes, silver drops | सोने स्थिर, चांदी घसरली

सोने स्थिर, चांदी घसरली

नवी दिल्ली : परेदशात सोन्याला मजबुती मिळूनही बुधवारी स्थानिक दागिने विक्रेत्यांनी किरकोळ खरेदी केल्याने दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर २५,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिर राहिले.
त्याचवेळी औद्योगिक प्रकल्प आणि नाणे निर्मात्यांकडून कमी मागणी झाल्याने चांदी १०० रुपयांनी घसरून ३३,५५० रुपये प्रति किलो झाली. सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, दागिने विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांनी मर्यादित प्रमाणात खरेदी केल्याने सोन्याचे भाव स्थिर राहिले.
सिंगापुरात सोने ०.२ टक्क्याच्या तेजीने १,०७०.९० डॉलर प्रति औंस झाले. लंडनमध्ये प्रारंभीच्या सौद्यात सोन्याची किरकोळ घसरण होऊन १,०६८.२० डॉलर प्रति औंस असा भाव झाला. राष्ट्रीय राजधानीत ९९.९ आणि ९९.५ शुद्धता असणारे सोने अनुक्रमे २५,६५० रुपये आणि २५,५०० रुपये प्रति १० ग्रॅम या भावावर स्थिर
राहिले.

मंगळवारी यात ४५ रुपयांनी तेजी आली होती. चांदी घसरली असली तरीही चांदीच्या नाण्याचे भाव स्थिर राहिले. १०० नाण्यांच्या खरेदीचा दर ४८ हजार रुपये, तर विक्रीचा दर ४९ हजार रुपये असा कायम राहिला.

Web Title: Gold stabilizes, silver drops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.