Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याची तस्करी पाच पट वाढली

सोन्याची तस्करी पाच पट वाढली

सोन्याच्या तस्करीमध्ये वाढ झाली आहे. सोन्याच्या आयातीवरील निर्बंध शिथिल केल्यानंतरही २०१२-२०१३ च्या तुलनेत २०१४-२०१५ मध्ये ही तस्करी पाचपट वाढली.

By admin | Updated: June 15, 2015 00:51 IST2015-06-15T00:51:48+5:302015-06-15T00:51:48+5:30

सोन्याच्या तस्करीमध्ये वाढ झाली आहे. सोन्याच्या आयातीवरील निर्बंध शिथिल केल्यानंतरही २०१२-२०१३ च्या तुलनेत २०१४-२०१५ मध्ये ही तस्करी पाचपट वाढली.

Gold smuggled five times | सोन्याची तस्करी पाच पट वाढली

सोन्याची तस्करी पाच पट वाढली

नवी दिल्ली : सोन्याच्या तस्करीमध्ये वाढ झाली आहे. सोन्याच्या आयातीवरील निर्बंध शिथिल केल्यानंतरही २०१२-२०१३ च्या तुलनेत २०१४-२०१५ मध्ये ही तस्करी पाचपट वाढली. यादरम्यान १,१२० कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले.
या कालावधीत कायदेशीर मार्गांनी सोन्याच्या आयातीत उल्लेखनीय वाढ झाली असून तस्करीही कमी झालेली नाही. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार २०१४-२०१५ दरम्यान देशात सोने तस्करीची ४,४०० प्रकरणे नोंदली गेली व त्यात १,१२० कोटी रुपयांचे ४,४८० किलो (४.४८ टन) सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणात २५२ जणांना अटक करण्यात आली.
आर्थिक वर्ष २०१२-२०१३ मध्ये सोन्याच्या तस्करीची ८७० प्रकरणे उघडकीस आली. २०२४-२०१५ च्या तुलनेत हे प्रमाण पाचपट कमी आहे. या प्रकरणात १०० कोटी रुपयांचे ४०० किलो सोने जप्त झाले. २०१२-२०१३ मध्ये २,७०० प्रकरणे नोंद झाली व ६९० कोटी रुपयांचे २,७६० किलो सोने जप्त झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gold smuggled five times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.